तिसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांची भारतीय खेळाडूंवर वर्णभेदी शेरेबाजी

दैनिक गोमन्तक
रविवार, 10 जानेवारी 2021

तिसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात खेळ थांबविण्यात आला आहे. भारतीयऑस्ट्रेलियाच्या समर्थकांनी टीम इंडियाचे गोलंदाज मोहम्मद सिराज याला डिवचल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

सिडनी: तिसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात खेळ थांबविण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांनी टीम इंडियाचे गोलंदाज मोहम्मद सिराज याला डिवचल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
  
सिडनीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियात तिसरा कसोटी सामना खेळण्यात येत आहे. साधारणपणे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामन्यात खेळाडू एकमेकांना डिवचतात. यामध्ये काहीवेळा हे खेळाडू शिवीगाळ करतात. मात्र आता क्रिकेट सामना पाहायला आलेल्या चाहत्यांकडून शिवीगाळ तसेच वर्णद्वेषी टीका करण्यात आली आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांनी टीम इंडियाचे गोलंदाज मोहम्मद सिराज याला शिव्या दिल्या असल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या सर्व प्रकरणाबाबत टीम इंडियाकडून सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. काही प्रेक्षकांना ग्राउंडणधून बाहेर धेवून जाण्यात आलं आहे. यानंतर तिसर्‍या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात पुन्हा खेळ सुरू होईल.

आणखी वाचा:

स्टेनमनमुळे ईस्ट बंगालचा दबदबा ; गतविजेत्या बंगळूरवर सलग चौथ्या पराभवाची नामुष्की -

संबंधित बातम्या