INDvsAUS : चौथ्या कसोटीआधी 'टीम इंडिया'च्या डोकेदुखीत वाढ ; हा खेळाडू संघाबाहेर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

 टीम इंडियामधील रवींद्र जडेजा, अश्विन आणि हनुमा विहिरी हे महत्वाचे शिलेदार दुखापतग्रस्त असतानाच, आता भारताला आणखी एक धक्का बसला आहे.

ब्रिस्बेन :  भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीआधी 'टीम इंडिया'च्या डोकेदुखीत वाढ; या खेळाडूला दुखापत टीम इंडियामधील रवींद्र जडेजा, अश्विन आणि हनुमा विहिरी हे महत्वाचे शिलेदार दुखापतग्रस्त असतानाच, आता भारताला आणखी एक धक्का बसला आहे.

ते म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा देखील दुखापतग्रस्त झाला आहे व चौथ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. १५ जानेवारीपासून ब्रिस्बेन इथं होणाऱ्या भारत - ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी आधी महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे टीम इंडियाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या