Ravindra Jadeja: जड्डूचा नवा विक्रम! कपिल देव नंतर 'असा' डबल धमाका करणारा दुसराच भारतीय ऑलराऊंडर

इंदूर कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट्स घेत भारताच्या रविंद्र जडेजाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Ravindra Jadeja
Ravindra JadejaDainik Gomantak

Ravindra Jadeja: इंदूर येथे बुधवारी (1 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने मोठा कारनामा केला आहे.

या सामन्यात भारताचा संघ 109 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 54 षटकात 4 बाद 156 धावा केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या या चारही विकेट्स जडेजाने घेतल्या आहेत.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja: जड्डूनं नॅथन लायनला अवघ्या 24 तासांसाठी का केलं इंस्टाग्रामवर फॉलो?

जडेजाचा मोठा अष्टपैलू विक्रम

त्याने पहिल्या दिवशी ट्रेविस हेड, मार्नस लॅब्युशेन, उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांना बाद केले. त्यामुळे जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. पहिल्या दिवसानंकर त्याच्या नावावर 298 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 503 विकेट्स नोंदवल्या गेल्या आहेत.

त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 63 सामन्यांत 263 विकेट्स नोंदवल्या गेल्या आहेत. तसेच त्याने वनडेत 189 विकेट्स घेतल्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 51 विकेट्स घेतल्या आहेत.

त्यामुळे जडेजा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 विकेट्स आणि 5000 धावा करणारा दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्यानंतरचा दुसराच भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू ठरला आहे. जडेजाने 5000 धावांचा टप्पा यापूर्वीच पार केला होता. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या 298 सामन्यांत 5527 धावांची नोंद आहे.

Ravindra Jadeja
IND vs AUS: आले अन् गेले...! टीम इंडिया 109 धावांवर ऑल आऊट होताच भन्नाट Memes Viral

कपिल देव यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 356 सामन्यांत 687 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्यांनी 9031 धावा केल्या आहेत.

जडेजाने 5527 धावांमध्ये वनडेतील 2447 धावांचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील 457 धावांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने कसोटीत 2623 धावा केल्या आहेत.

भारताची फलंदाजी कोलमडली

दरम्यान, इंदूर कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी केली होती. पण भारताचा डाव 33.2 षटकातच केवळ 109 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 22 धावांची खेळी केली. तसेच शुभमन गिलने 21 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त मात्र भारताकडून कोणाला 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com