Suryakumar Yadav: 'सूर्य उगवलाच नाही', सलग तिसऱ्यांदा SKY गोल्डन डक झाल्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यात सूर्यकुमार यादव गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomantak

Suryakumar Yadav got a hat-trick of golden ducks: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (22 मार्च) चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या संपूर्ण मालिकेत भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव सपशेल अपयशी ठरला.

सलग तीनवेळा गोल्डन डक

सूर्यकुमार यादवसाठी ही मालिका एखाद्या भयानक स्वप्नासारखी राहिली. या संपूर्ण मालिकेत त्याला एकही धाव करता आली नाही. विशेष म्हणजे या मालिकेतील तिन्ही सामन्यात तो पहिला चेंडू खेळताना बाद झाला. त्याला या तिन्ही सामन्यात शुन्यावर बाद व्हावे लागले आहे.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav: टीम इंडियातून सूर्याचा पत्ता होणार कट? कॅप्टन रोहित म्हणतोय, 'आधीही सांगितलं...'

मुंबईत झालेल्या पहिल्या सामन्यात तो पाचव्या षटकात विराट कोहली बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. पण सूर्यकुमार पहिलाच चेंडू खेळताना मिचेल स्टार्कने त्याला पायचीत केले.

त्यानंतर विशाखापट्टणमला झालेल्या दुसऱ्या सामन्यातही पाचव्याच षटकात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार फलंदाजीला आला होता. पण त्यावेळीही पहिलाच चेंडू खेळताना मिचेल स्टार्कनेच त्याला पायचीत पकडले.

त्यानंतर आता चेन्नईत झालेल्या तिसऱ्या सामन्यात तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. पण यावेळीही त्याला एश्टन एगारने पहिलाच चेंडू खेळताना त्रिफळाचीत केले. त्यामुळे त्याच्यावर सलग तीन सामन्यात गोल्डन डक होण्याची नामुष्की ओढावली.

मीम्स व्हायरल

दरम्यान, सूर्यकुमार सलग तीन सामन्यात गोल्डन डकवर बाद झाल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल झाले आहे. अनेक युजर्सने गमतीशीर मीम्स शेअर करत खिल्ली उडवण्याचा प्रयत्नही केला आहे. काहींनी यावेळी सूर्य उगवला नाही, अशा अर्थाचे मीम्स शेअर केले आहेत.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav: सूर्याला नक्की झालंय काय? सलग दोन गोल्डन डकसह नकोसा विक्रम नावावर

ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय

एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी २७० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 49.1 षटकात 248 धावांवर सर्वबाद झाला.

त्यापूर्वी या मालिकेत मुंबईत झालेल्या पहिल्या वनडेत भारताने ५ विकेट्सने विजय मिळवला होता, तर विशाखापट्टणमला झालेल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने १० विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली होती. अखेर ऑस्ट्रेलियाने चेन्नईत झालेला निर्णायक सामना जिंकला आणि मालिकाही खिशाल टाकली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com