IND vs AUS: सूर्यकुमार यादवसाठी आली ही मोठी बातमी, केला मोठा चमत्कार

India vs Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाला 4 गडी राखून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomantak

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाला 4 गडी राखून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवादरम्यान टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर, सूर्यकुमार यादवने ताज्या आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत जगातील सर्वोत्तम टी-20 फलंदाज बनण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.

सूर्यकुमार यादवसाठी ही मोठी बातमी आली

सूर्यकुमार यादव 780 गुणांसह टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. केवळ पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान (825 गुण) आणि दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम (792 गुण) हे सूर्यकुमारच्या पुढे आहेत. दुसरीकडे, कराचीमध्ये मंगळवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद रिझवानने अर्धशतक झळकावले.

Suryakumar Yadav
Ind vs Aus: ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी ; पहिल्या T20 सामन्यात चार गडी राखून विजय

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मोठी आघाडी घेतली

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या (Australia) खेळाडूंनी T20 क्रमवारीत मोठी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंड आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनीही क्रमवारीत आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा (Team India) स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) क्रमवारीत 65 व्या स्थानांवर पोहोचला आहे, तर अक्षर पटेल या क्रमवारीत 33 व्या स्थानावर पोहोचला आहे.

Suryakumar Yadav
IND vs AUS 1st T20: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील T20 मालिकेला आजपासून सुरुवात..

जोश हेझलवूड नंबर 1 गोलंदाज

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीद तिसऱ्या स्थानावर आणि तबरेझ शम्सीच्या दुसऱ्या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com