Hardik Pandyaच्या पोस्टवर कमेंट करत 'ही' पाकिस्तानी अभिनेत्री झाली ट्रोल

Pakistani Actress Troll Team India: ऑस्ट्रेलियाकडून भारताच्या पराभवावर, एका पाकिस्तानी अभिनेत्रीने टिप्पणी असून ती ट्रोल होत आहे.
Hardik Pandya
Hardik PandyaDainik Gomantak

ट्रोल, हा शब्द आजच्या काळात खूप लोकप्रिय झाला आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या तारकांना याचा सामना करावा लागतो. सध्या एक पाकिस्तानी अभिनेत्री तिच्या एका ट्विटमुळे खूप चर्चेत आहे आणि तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या टी20 (T-20) सामन्यात 4 विकेट्सने मात दिली. या सामन्यानंतर स्टार अष्टपैलू हार्दीकने (Hardik Pandya) सामन्यातील एक फोटो शेअर करत पराभवातून 'आम्ही शिकू आणि आणखी सुधार करु अशा आशयाचं ट्वीट केले आहे.' या ट्वीटवर पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने कमेंट केल्याने ती चांगलीच ट्रोल होत आहे.

तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही टी20 मालिका भारतात सुरु आहे. यातील पहिल्या सामन्यात भारताने 209 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवले, पण ऑस्ट्रेलियाने 4 गडी आणि 4 चेंडू राखून सामना जिंकला. ज्यानंतर सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या हार्दीक पंड्याने खिलाडूवृत्तीने एक ट्वीट केले आहे.

त्याने लिहिलं, ''आम्ही यातून शिकू आणि आणखी सुधारणा करु, आम्हाला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचे खूप खूप धन्यवाद'' दरम्यान हार्दीकच्या या ट्वीटवर पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी हिने कमेंट करत लिहिले की,''23 ऑक्टोबरला विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानकडूनही पराभूत व्हा, म्हणजे आणखी शिकाल''. सेहरच्या या ट्रोल करणाऱ्या कमेंटनंतर भारतीय (India) हत्यांनी तिलाच ट्रोल करत अनेक मजेशीर कमेंट केल्या आहेत.

Hardik Pandya
IND W vs ENG W: भारतीय महिला संघाने 23 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये जिंकली वनडे मालिका

भारतीय चाहत्यांनी केलं ट्रोल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com