INDvsAUS : 'शार्दुल ठाकूर-वॉशिंग्टन सुंदर'च्या खेळीने टीम इंडियाला तारलं

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 17 जानेवारी 2021

युवा खेळाडू शार्दुल ठाकूर व वॉशिंग्टन सुंदर यांच्या यांच्या संयमी खेळीमुळे  ब्रिस्बेन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने 336 धावांची मजल मारली.

ब्रिस्बेन :  युवा खेळाडू शार्दुल ठाकूर व वॉशिंग्टन सुंदर यांच्या यांच्या संयमी खेळीमुळे  ब्रिस्बेन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने 336 धावांची मजल मारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावांत केवळ ३३ धावांची आघाडी मिळाली आहे.

भारताचा डाव  सर्वबाद 336 झाल्यानंतर टीम ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर आणि हॅरिस दुसऱ्या खेळीसाठी मैदानात आले. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाकडे तिसरा दिवस संपल्यावर एकूण 54 धावांची आघाडी आहे. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर सुरू असलेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या सामन्यात भारताची निराशाजनक सुरूवात झाली.

भारताचे कर्णधार अजिंक्य रहाणे 37 व चेतेश्वर पुजारा 25  धावा काढून स्वस्तात तंबूत परतले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या होत्या. त्याआधी भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा व शुभमन गील अनुक्रमे 44 व 7 धावा काढून आऊट झाले. ऋषभ पंत 23 व मयांक अगरवाल 38 धावा करू शकले. शार्दुल ठाकूरने 67 व वॉशिंग्टन सुंदरने 62 करत सातव्या विकेटसाठी धावांची भागीदारी केली.

संबंधित बातम्या