INDvsAUS : बॉर्डर-गावसकर मालिकेच्या तिसऱ्या सामन्यावर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड, टीम इंडिया अडचणीत

वृत्तसंस्था
रविवार, 10 जानेवारी 2021

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी भारताला ४०७ धावांचं आव्हान दिलेलं आहे.

सिडनी : बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी भारताला ४०७ धावांचं आव्हान दिलेलं आहे. आज ९४ धावांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियानं आपला दुसरा डाव ३१२ धावांवर घोषित केला. कालप्रमाणेच आजही क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांचा चीम इंडियाला मोठा फटका बसला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना अनेक वेळा जीवनदान दिल्यामुळे हा सामना जिंकणे टीम इंडियासाठी खडतर ठरणार आहे. 

फलंदाजी करताना जाडेजाच्या बोटाला दुखपत झाल्यामुळे रविंद्र जाडेजाची हि मालिका खेळू शकणार नाही. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भारताला त्याची उणाव भासल्याचे स्पष्टपणे जाणवले. यामुळे टीम इंडियाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.  

सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया वरचढ ठरलं होतं. आज त्यांनी सामन्यावर पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाकडून कॅमरुन ग्रीन (८४), स्मिथ (८१) आणि लाबुशेन (७३) यांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने ३१२ धावा केल्या. भारताकडून नवदिप सैनी आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 2 बळी  घेतले.

 

अधिक वाचा :

तिसऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या समर्थकांची भारतीय खेळाडूंवर वर्णभेदी शेरेबाजी 

संबंधित बातम्या