INDvsAUS तिसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सची गरज, शेवटच्या २० ओव्हर्स निर्णायक

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जानेवारी 2021

ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी मालिकेच्या सिडनीतील तिसऱ्या सामन्यात ४०७ धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी चांगला खेळ केला.

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरूद्ध कसोटी मालिकेच्या सिडनीतील तिसऱ्या सामन्यात ४०७ धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी चांगला खेळ केला. ऋषभ पंतने दमदार खेळी करत भारताच्या विजयाची शक्याता कायम ठेवली. चहापानाच्या वेळेपर्यंत भारताच्या ५ बाद २८० धावा झाल्या होत्या. आता सगळा निर्णय शेवटच्या सत्रावर अवलंबून असून, हा सामना जिंकण्यासाठी भारताला  १०७  धावांची तर ऑस्ट्रेलियाला ५ बळींची गरज आहे. 

कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजाराबरोबर फलंदाजी करताना चांगली सुरूवात करून दिली. रहाणे लवकर माघारी परतला, परंतु पंतने चांगली खेळी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावा केल्या. त्याच्या शतकाला अवघ्या तीन धावांनी हुलकावणी दिली. नॅथन लायनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. अत्यंत शांतपणे टिकून असलेला पुजारादेखील २०५ चेंडूत ७७ धावा करून त्रिफळाचीत झाला. आता शेवटच्या सत्रात जिंकण्यासाठी भारतीय गोलंदाजीवर सगळी मदार आहे.

संबंधित बातम्या