IND vs AUS, 1st ODI: जडेजाचे वनडेत पुनरागमन, पण हिटमॅनची जागा घेणार कोण? पाहा कशी असेल Playing XI

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मुंबईमध्ये पहिला वनडे सामना होणार असून या सामन्याला रोहित शर्मा मुकणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India vs Australia, 1st ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच कसोटी मालिका पार पडली. या कसोटी मालिकेनंतर आता १७ मार्चपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

पण पहिल्या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा खेळणार नाही. तो काही कौटुंबिक कारणामुळे या सामन्याला मुकणार असल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात हार्दिक पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

Team India
IND vs AUS: सूर्या पुन्हा घेणार गगनभरारी, पहिल्या वनडेत एन्ट्री पक्की!

मात्र, आता रोहित या सामन्यात खेळणार नसल्याने सलामीला फलंदाजी कोण करणार हा प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनेसमोर उभा असेल. सध्या भारताकडे रोहितच्या अनुपस्थितीत शुभमन गिल, केएल राहुल आणि ईशान किशन असे पर्यात आहेत.

पण सध्याचा फॉर्म आणि गेल्या काही दिवसातील कामगिरी लक्षात घेता शुभमन गिल आणि ईशान किशन हे दोघे सलामीला फलंदाजी करण्याची शक्यता दाट आहे. ईशान यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळू शकतो.

त्याचबरोबर श्रेयस अय्यर देखील दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागेवर सूर्यकुमार यादव मुंबई वनडेत प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसू शकतो. तसेच विराट कोहलीही मधल्या फळीत असेल.

Team India
IND vs AUS: 'जेव्हा प्राईजमनी शेअर करावी लागते...', अश्विन - जडेजाचा Video तुफान व्हायरल

याचबरोबर जडेजाचेही वनडे संघात पुनरागमन झाले असल्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचीही जागा जवळपास पक्की आहे. त्याने दुखापतीनंतर गेल्याच महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघात यशस्वी पुनरागमन केले होते.

गोलंदाजी फळीबद्दल बोलायचे झाल्यास जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सर्वाधिक मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर असेल. तसेच त्यांना शार्दुल ठाकूरचीही साथ मिळू शकते. त्याचबरोबर या तिघांच्या जोडीला कर्णधार हार्दिक पंड्या असेल.

फिरकी गोलंदाजीसाठी जडेजाव्यतिरिक्त कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी दिली जाऊ शकते. सुंदर तळात फलंदाजीमध्येही चांगले योगदान देऊ शकतो.

पहिल्या वनडेसाठी अशी असू शकते भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com