INDvsENG : टीम इंडियाच्या या दोन गोलंदाजांमध्ये ऑल इज नॉट वेल? सोशल मिडियावर व्हिडिओ व्हयरल

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे खेळवल्या जाणार्‍या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या 2 खेळाडूंमध्ये चढाओढ झाली.

चेन्नई :  भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे खेळवल्या जाणार्‍या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या 2 खेळाडूंमध्ये चढाओढ झाली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे , ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याची मान पकडताना दिसत आहे. सिराज खूप रागात असल्याचे दिसत आहे आणि त्याची ही कृती पाहिल्यावर चाहते खूप रागावले आहेत. सोशल मीडियावर चाहते मोहम्मद सिराजला या कृतीबद्दल विचारत आहेत.

INDvsENG : दुसरा दिवस जो रूटच्या नावावर; इग्लंडची शानदार खेळी

मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव दोघांनाही चेन्नई कसोटीतील अकरा खेळाडूंच्या यादीत स्थान मिळालं नाही. कुलदीप यादवऐवजी इशांत शर्मा आणि सिराजच्या जागी डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमला पसंती देण्यात आली. मात्र या दोघांमध्ये ड्रेसिंग रूमच्या बाहेर असे काहीतरी घडले, कि त्यानंतर सिराजने कुलदीपची मान पकडली. अनेकांकडून हा व्हिडिओ शेअरल केला जात असून, अनेकांनी ही केवळ एक मजा असल्याचे सांगितले आहे.

सिराजवर कारवाई होईल का?

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर सर्वाधिक 13 विकेट घेणारा मोहम्मद सिराज एका रात्रीत हिरो बनला पण आता त्याच्या या वृत्तीवर चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत. चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज कुलदीप यादवची मान जोराने धरताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिराज खूप चिडलेला दिसत आहे. सिराज आणि कुलदीप यांच्यातील गमतीदार गोष्टीत असे घडण्याची शक्यता क्वचितच पाहायला मिळते. आता हे प्रकरण काय ते पुढे उघड होईल, पण प्रश्न असा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर टीम व्यवस्थापन काही कारवाई करेल का?

हैदराबाद नॉर्थईस्टचे `मिशन टॉप फोर`

यापूर्वीही भारतीय खेळाडूंमध्ये भांडणे झाली आहेत, टीम इंडियाच्या खेळाडूंमध्येही यापूर्वी वाद झाले आहेत. 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांच्यात वादझाला होता. सुरेश रैनाने जडेजाची जर्सी खेचली. इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. आता अशी घटना सिराज आणि कुलदीप यादव यांच्यात पाहायला मिळाली आहे, ही एक मजा आहे कि काही गंभीर बाब ते वेळच सांगेल.

संबंधित बातम्या