IND Vs ENG: धोनीच्या बालेकिल्ल्यात फोक्सने अशी करून दिली 'थाला'ची आठवण

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळवला जात आहे.

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळवला जात आहे. दुसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या अर्ध्या तासात भारताने चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि रिषभ पंतची विकेट गमावली. इंग्लंडचा यष्टिरक्षक बेन फॉक्सने या विकेट्समध्ये आपलं योगदान दिलं. बेन फॉक्सने अप्रतिम स्टंपिंग करत चेन्नईच्या चाहत्यांना महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली.

INDvsENG : सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या रिषभ पंतच्या नावावर झाला अनोखा विक्रम 

पहिल्याच सत्रात भारताने चेतेश्वर पुजाराची विकेट गमावली. पुजाराने शॉर्ट लेगमध्ये मारलेला चेंडू ओली पोपच्या हातात गेला. पोपने तो लवकर फॉक्सच्या हातात फेकला आणि या इंग्लिश यष्टीरक्षकाने वेळ न गमावता स्टम्प उडवला. यानंतर रोहित शर्माच्या पहिल्या डावातील शतकामुळे भारताला मोठ्या आशा होत्या, पण जॅक लीचच्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. 

INDvsENG 2ndT Day2: टीम इंडिया मजबूत स्थितीत; अश्विनच्या फिरकीमुळे इंग्लंडचे फलंदाज गारद 

यानंतर रिषभ पंतला अजिंक्य रहाणेच्या जागी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविण्यात आले. पहिल्या डावात 58 धावा करणारा पंत जॅक लीचच्या चेंडूवर सहा धावांवर बाद झाला. सध्या भारताची धावसंख्या 37 षटकांत 6 गडी गमावून 114 अशी झाली आहे. रविचंद्रन अश्विन 8 आणि विराट कोहली 22 धावा खेळत आहेत.

संबंधित बातम्या