INDvsENG : दुसरा दिवस जो रूटच्या नावावर; इग्लंडची शानदार खेळी

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

पाहिल्या कसोटीचा दुसरा दिवस जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी दिमाखदार खेळी करत आपल्या नावावर केला.

चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळवला जात आहे. पाहिल्या कसोटीचा दुसरा दिवस जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी दिमाखदार खेळी करत आपल्या नावावर केला. जो रूट आणि बेन स्टोक्सच्या शानदार डावामुळे इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 8 गडी गमावून 555 धावा केल्या आहेत. जो रुटने आपल्या कारकीर्दीतील पाचवे द्विशतक झळकावले.दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जॅक लीच 6 आणि डोमच्या बेस 28 धावांवर नाबाद आहे. भारताकडून जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, शाहबाज नदीम आणि ईशांत शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

हैदराबाद नॉर्थईस्टचे `मिशन टॉप फोर`

डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमच्या लेगबॉलवर 377 चेंडुंमध्ये चेंडूच्या शानदार 2018 धावा करणारा जो रूट आउट झाला. रूटच्या कारकीर्दीतील हे पाचवे दुहेरी शतक आहे. या द्विशतकामुळे त्याने अ‍ॅलिस्टर कुक, दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गज खेळाडूंची बरोबरी केली. जो रूट आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला.

सेझा अकादमीस स्वयंगोलमुळे गुण

बेन स्टोक्सने रूटसह उत्तम खेळ करत  82 धावा केल्या. इंग्लंडने चहापानाआधी एक गडी गमावत 99 धावांची भर घातली. रूट आणि स्टोक्स यांनी चौथ्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. स्टोक्सने 10 चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. शाहबाज नदीमला स्लॉग स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. चेतेश्वर पुजाराने त्याचा झेल पकडला. स्टोक्स बाद झाल्यानंतर 23 वर्षीय युवा फलंदाज ओली पोप क्रीजवर आला. त्याने 34 धावांची खेळी केली आणि कर्णधार जो रूटसह पाचव्या विकेटसाठी 86 धावा जोडल्या. अश्विनच्या गोलंदाजीवर तो आउट झाला.

संबंधित बातम्या