IND VS ENG: मोटेरामध्ये टीम इंडियाचा विजय निश्चित! याची तीन मोठी कारणं जाणून घ्या

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

टीम इंडियाचा हा सामना जिंकणे जवळपास निश्चित मानले जाते. याची तीन मोठी कारणे आहेत. सध्या भारत विरूद्ध इंग्लंड ही चार सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जाईल. हा कसोटी सामना दिवस-रात्र स्वरूपाचा असणार आहे. यामुळे तो गुलाबी बॉलने खेळले जाईल. गुलाबी बॉलसह देशात फक्त एकच कसोटी सामना झाला असून टीम इंडियाने तो जिंकला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा हा सामना जिंकणे जवळपास निश्चित मानले जाते. याची तीन मोठी कारणे आहेत. सध्या भारत विरूद्ध इंग्लंड ही चार सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. दोन्ही संघांसाठी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी मालिकेचे उर्वरित दोन्ही सामने महत्त्वाचे आहेत.

INDvsENG: मायकेल वॉनने पाकच्या मैदानाचा फोटो केला शेअर; खेळपट्टीवरून पुन्हा डिवचले  

1. आतापर्यंत सहा संघ मायदेशात डे-नाईट टेस्ट खेळले आहेत. टीम इंडिया व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि विंडीज या संघांचा समावेश आहे. विंडीज वगळता इतर सगळ्यांनी मायदेशात खेळवल्या गेलेले दिवस-रात्र कसोटी सामने जिंकले आहेत. कसोटीत विंडीज संघ कमकुवत मानला जातो आणि जागतिक क्रमवारीत तो 8व्या क्रमाकांवर आहे. म्हणजेच, उरलेले संघांनी मायदेशातील डे-नाईट सामने गमावलेले नाहीत. भारतातील कसोटी एसजी बॉलने, तर इंग्लंडमध्ये ड्यूक बॉलने खेळले जातात. याचा फायदा टीम इंडियाला होण्याची शक्यता आहे. 

2. मोटेरा स्टेडियमवरील कसोटीत इंग्लंडचा संघ भारताला  कधीही पराभूत करू शकलेला नाही. या दोघांमधील या मैदानावर दोन कसोटी सामने खेळवले गेले आहेत. टीम इंडियाने एक जिंकला तर एक सामना अनिर्णित राहिला. टीम इंडिया 13 वर्षांपासून मोटेरामध्ये हरलेली नाही आणि शेवटच्या तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकला आहे, दोन ड्रॉ झाले आहेत. फिरकी गोलंदाजांच्यानुसार खेळपट्टी तयार केली जात आहे. अशा परिस्थितीत आर अश्विन आणि अक्षर पटेल पुन्हा एकदा इंग्लिश संघावर वर्चस्व मिळवू शकतात.

3. टीम इंडियाने 9 वर्षांपासून मायदेशात कसोटी मालिका गमावली नाही आणि सलग 12 मालिका जिंकल्या आहेत. यावेळी संघाने बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, विंडीज, अफगाणिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. म्हणजेच, शेवटच्या 12 मालिकेत 8 संघ घरातील टीम इंडियाला पराभूत करू शकले नाहीत. त्याशिवाय घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या अखेरच्या मालिकेत टीम इंडियाने इंग्लंडला 4-0 ने पराभूत केले. पाच सामन्यांच्या मालिकेतील एक सामना अनिर्णित ठरला. दोन सामने हे एका डावाने जिंकले आहेत.

INDvsENG: मायकेल वॉनने पाकच्या मैदानाचा फोटो केला शेअर; खेळपट्टीवरून पुन्हा डिवचले 

अश्विन आणि कोहली हेच विजयाचे नायक होते

नोव्हेंबर-डिसेंबर 2016 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या मालिकेत विराट कोहली आणि आर अश्विन हे संघाच्या विजयाचे नायक ठरले होते. कोहलीने 5 सामन्यांच्या 8 डावांमध्ये 109 च्या सरासरीने सर्वाधिक 655 धावा केल्या. दोन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली होती. त्याचवेळी ऑफस्पिनर आर अश्विनने सर्वाधिक 28 बळी घेतले. तीन वेळा पाच विकेट्स आणि एकदा 10 विकेट्स घेतल्या. अश्विनने सध्याच्या मालिकेच्या दोन सामन्यात 17 बळी घेतले आहेत.

संबंधित बातम्या