IND Vs ENG : 'शेन वॉर्न'ची अजब भविष्यवाणी; "टिम इंडिया चहापानाआधीच फलंदाजीला उतरेल"

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

चेन्नई येथे भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 157 धावांवर बाद होईल अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने केली आहे. 

चेन्नई :  चेन्नई येथे भारत विरुद्ध इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 157 धावांवर बाद होईल अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने केली आहे. वॉर्नने ट्विट केले की, "चेन्नई येथे इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात आजच्या खेळाविषयीची माझी भविष्यवाणी !!! भारताचा डाव 359 धावांवर आटोपला, पण चहापानाआधीच भारत पुन्हा फलंदाजीसाठी मैदानावर उतरेल”.

IND vs ENG: टीम इंडियाच्या गोलंदाजीची कमाल; इंगलंडचा संघ संकटात

दुसर्‍या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडच्या संघाने चार विकेट गमावून 39 धावा केल्या आहेत. बेन स्टोक्स क्रीजवर आहे. दुपारच्या जेवणापूर्वी डॅनिल लॉरेन्स अश्विनच्या शेवटच्या बॉलवर बाद झाला इंग्लंडची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर रोरी बर्न्स पहिल्याच षटकात खाते न उघडता इशांत शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्यानंतर दुसरा सलामीवीर डोम सिब्ली काही खास कामगिरी करू शकला नाही. 16 धावा बनवून तो अश्विनचा बळी ठरला.

IND vs ENG : रिषभ पंत-अक्षर पटेलवर वर नजरा खिळल्या; मोठ्या खेळीची अपेक्षा

इंग्लंडच्या संघाला त्यांचा कर्णधार जो रूटकडून मोठ्या आशा होत्या पण आज तो केवळ 6 धावा करू शकला. ही अक्षर पटेलची आंतरराष्ट्रीय कसोटीतील पहिली विकेट होती. त्याआधी दुसर्‍या दिवशी भारताचा डाव 329 धावांवर आटोपला. भारताकडून रोहित शर्माने 161, अजिंक्य रहाणेने 67 आणि रिषभ पंतने नाबाद 58 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्यांच्याशिवाय ऑली स्टोनने तीन विकेट्स घेतल्या आहेत.

 

संबंधित बातम्या