INDvsENG : सुपरकूल चेतेश्वर पुजारादेखील विकेट गमावल्याने झाला नाराज

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

राहुल द्रविड नंतर टीम इंडियाची वॉल म्हणून ओळखल्या जाणारा चेतेश्वर पुजारा चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात 73 धावा केल्या. 

वी दिल्ली : राहुल द्रविड नंतर टीम इंडियाची वॉल म्हणून ओळखल्या जाणारा चेतेश्वर पुजारा चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात 73 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने 143 चेंडू खेळत 11 चौकार ठोकले. पुजाराने चेन्नईत शानदार फलंदाजी केली, परंतु ज्या पद्धतीने त्याची विकेट गेली, त्यामुळे त्याच्या चाहत्यांबरोबरच तोदेखील निराश झालेला दिसला. चेतेश्वर पुजाराला डोम बेसने बाद केले.

भारतीय डावाच्या 51 व्या षटकात डोम बेसच्या शॉर्ट बॉलवर पुजाराने लेगच्या बाजूला पूल शॉट खेळला. पण चेंडू शॉर्ट लेगवर उभा असलेल्या डोम बेसच्या मागील बाजूस जाऊन सरळ बाऊन्स करुन रोरी बर्न्सच्या हाती गेला. पुजाराला त्याच्या बाद होण्यावर काही काळ विश्वासच बसला नाही. यावेळी तो आपली निराशा लपवू शकला नाही आणि त्याने निराशेच्या भरात आपली बॅट लेग पॅडवर आपटली. चेतेश्वर पुजारा हा अत्यंत शांत आणि संयमी खेळाडू म्हणून ओळखला जाते. आऊट झाल्यानंतरदेखील त्यांचा संयम क्वचितच ढासळतो.

भारतीय संघाने केवळ  73 धावांवर शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या विकेट गमावल्या. यानंतर पुजाराने पंतसमवेत भारतीय डाव हाताळला. दोन्ही खेळाडूंमध्ये 118 धावांची भागीदारी झाली. पुजाराला मोठ्या खेळीची अपेक्षा होती पण तसे होऊ शकले नाही. पुजारा बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक रिषभ पंतदेखील पॅव्हेलियनमध्ये परतला. पंतने 88 चेंडूत 91 धावा केल्या. पंतने त्याच्या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकार लगावले. पंतची विकेटही डोम बेसने घेतली. त्याच्या चेंडूवर षटकार लावण्याच्या वेळी पंतने जॅक लीचला सहज झेल दिला. 

संबंधित बातम्या