IND VS ENG: T-20 मालिकेसठी टीम इंडियाची घोषणा; हे खेळाडू संघाबाहेर

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

इंग्लंड विरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या T-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक ईशान किशनला या संघात संधी मिळाली आहे, तर स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवलाही संघात स्थान मिळालं आहे.

नवी दिल्ली : इंग्लंड विरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या T-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक ईशान किशनला या संघात संधी मिळाली आहे, तर स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवलाही संघात स्थान मिळालं आहे. अष्टपैलू राहुल तेवतियाचीही टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. रिषभ पंतने कसोटी सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याने T-20 संघातही तो परतला आहे.

ISL 2020-21: मुंबई सिटीस पराभवाचा जबर हादरा; बदली खेळाडूंच्या गोलमुळे जमशेदपूरचा सनसनाटी विजय

जसप्रीत बुमराहला T-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, त्याच्याऐवजी भुवनेश्वर कुमारचे संघात पुनरागमन झाले आहे. संजू सॅमसनची संघात निवड झालेली नाही. संजू सॅमसनने 7 टी -20 सामन्यांमध्ये 11.8 च्या सरासरीने केवळ 83 धावा केल्या, त्यानंतर निवड समितीने इशान किशनला संधी दिली. गोलंदाज कुलदीप यादवचादेखील T-20 संघात समावेश नाही. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौर्‍याबाहेर गेलेला वरुण चक्रवर्तीही पुन्हा संघात स्थान मिळविण्यात यशस्वी झाला आहे. अक्षर पटेलही T-20 संघात परतला आहे. लेगस्पिनर राहुल चहर आणि क्रुणाल पंड्या या संघात स्थान मिळविण्यात अपयशी ठरले. टी-२० चा चांगला रेकॉर्ड असूनही मनीष पांडेलादेखील संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

धेंपो क्लबची विजयी चमक रिचर्ड व गौरवच्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सवर मात

इंग्लंड विरूद्धच्या T-20 मालिकेसाठी टीम इंडिया - विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, ईशान किशन, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल टोटिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

भारत-इंग्लंड T-20 मालिकेचे वेळापत्रक 

टी -20 मालिकेचे सर्व सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळले जातील. T-20 मालिका 12 मार्चपासून सुरू होईल. दुसरा T-20 सामना 14 मार्च रोजी, तिसरा 16 मार्च, चौथा 18 मार्च आणि पाचवा सामना 20 मार्च रोजी खेळवला जाईल. यानंतर 23 मार्च पासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकादेखील खेळवली जाईल.

संबंधित बातम्या