INDVsENG Test 2 : टीम इंडियाचं दमदार कमबॅक; इंग्लंडला 317 धावांनी दिली मात

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान झालेला रोमहर्षक दुसरा कसोटी सामना भारताने 317 धावांनी आपल्या खिशात घातला.

चेन्नई :  भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान झालेला रोमहर्षक दुसरा कसोटी सामना भारताने 317 धावांनी आपल्या खिशात घातला.भारताला 54.2 षटकांत दहावी विकेट मिळाली.विकेटकिपर रिषभ पंतने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोईन अलीला स्टम्प आऊट केले. मोईन अली 18 चेंडूत 3 चौकार आणि  5 षटकारांसह 43 धावांची खेळी करून पॅवेलियनला परतला. इंग्लंडचा दुसरा डाव 164 धावांवर आटोपला. भारताकडून पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्याचा आजचा चौथा दिवस होता, टीम इंडियाने काल दमदार खेळी करत या सामन्यात आपली पकड मजबूत केलली होती. भारतीय संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 286 धावा केलेल्या होत्या आणि त्यामुळे इंग्लंडच्या संघाला विजयासाठी 482 धावांचे लक्ष्य भारताने दिलेले होते. भारताने आज इंग्लंडच्या संघाला दुसऱ्या डावात रोख सामना आपल्या खिशात घातला. आता भारत विरूद्ध इंग्लंड चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-1 अशा बरोबरीवर आहे. आज इंग्लंडची चौथ्या दिवसाची सुरूवात खराब झाली.

दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडच्या 3 बाद 52 धावा झाल्या होत्या. रविचंद्रन अश्विनने लॉरेन्सला बाद करत आजच्या दिवसाची चांगली सुरूवात केली. भारताने दिलेल्या 482 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने भारताविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी मंगळवारी दुपारच्या जेवणापर्यंत सात विकेट्सवर 116 धावा केल्या होत्या.  भारताकडून रविचंद्रन अश्विनने तीन अक्षर पटेल पाच विकेट घेत कमाल खेळ केला. तर, कुलदिप यादवने २ विकेट घेत आलं योगदान दिलं. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 43 धावा केल्या.

संबंधित बातम्या