INDVsENG : इंग्लंडचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

भारत विरूद्ध इंग्लंड दरम्यानचा तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून अहमदाबादच्या मोटेरा क्रिकेट स्टेडियमवर सुरूवात झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : भारत विरूद्ध इंग्लंड दरम्यानचा तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून अहमदाबादच्या मोटेरा क्रिकेट स्टेडियमवर सुरूवात झाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा डे-नाईट कसोटी सामना आहे, जो गुलाबी बॉलने खेळवला जाणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीची निर्णय घेतला आहे.  इंग्लंड संघात काही बदल करण्यात आले आहेत. रॉरी बर्न्सची जागा जॅक क्रोली, लॉरेन्स स्टोन आणि मोईन अलीऐवजी जेम्स अँडरसन आणि जोफ्रा आर्चरचा समावेश कऱण्यात आला आहे.

INDvsENG : तिसऱ्या डे नाईट सामन्यात कोण ठरणार वरचढ? गौतम गंभीरनेच दिले याचे उत्तर  

त्याचबरोबर जसप्रीत बुमराह भारतीय संघात पुनरागमन करीत आहे. सिराज बाहेर आहे आणि कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत चार सामन्यांच्या मालिकेचे दोन कसोटी सामने खेळवले गेले आहेत. चेन्नई येथे दोन्ही सामने खेळवले गेले होते, ज्यात भारताने एकाने तर इंग्लंडने एक विजय मिळविला होता. दोन्ही संघ प्रत्येकी एका विजयासह 1-1 च्या बरोबरीवर आहेत. पहिल्या कसोटीत इंग्लंडने 227 धावांनी विजय मिळविला. त्याचवेळी भारताने दुसरा कसोटी सामना 317 धावांनी जिंकला.

INDvsENG : डे नाईट सामन्यापूर्वी आशिष नेहराने पाहुण्या संघाला दिला अमूल्य सल्ला 

टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा,  रिषभ पंत (विकेटकीपर) , रविचंद्रन अश्विन, विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, अजिंक्य रहाणे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल , इशांत शर्मा 

इंग्लंड संघ : डोमिनिक सिब्ली, जॅक क्रोली, जॉनी बेअरस्टो, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फॉक्स (विकेटकीपर), जोफ्रा आर्चर, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.

संबंधित बातम्या