INDVsENG : Video बेन स्टोक्स सिराजला असं काय म्हणाला,ज्यामुळे विराट कोहलीचा पारा चढला

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

स्टोक्स आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात बाचाबाची झाली. बेन स्टोक्स मोहम्मद सिराजला असे काही बोलला, ज्यामुळे विराट कोहली चिडला होता. सिराजने बेन स्टोक्सला बाउन्सर टाकला, त्यानंतर स्टोक्स सिराजला काहीतरी बोलला.

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. 50  षटकांपूर्वीच इंग्लंडने तीन मोठ्या विकेट्स  गमावल्या. जॅक क्रॉली (02) डोमिनिक सिब्ली (09) आणि कर्णधार जो रूट (05) झटकन बाद झाले. यानंतर बेन स्टोक्स क्रिजवर आला. क्रीजवर आल्यानंतर स्टोक्स आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात बाचाबाची झाली. बेन स्टोक्स मोहम्मद सिराजला असे काही बोलला, ज्यामुळे विराट कोहली चिडला होता. सिराजने बेन स्टोक्सला बाउन्सर टाकला, त्यानंतर स्टोक्स सिराजला काहीतरी बोलला.

WIvsSL: किरॉन पोलार्डने 6 चेंडूत ठोकले 6 षटकार; व्हिडीओ तुफान व्हायरल

यानंतर विराट कोहली बेन स्टोक्सकडे गेला. दोन्ही खेळाडूंमध्ये थोडा वाद झाला. दोघांची चर्चा लांबली असती, पण या प्रकरणात पंचांनी मध्यस्ती करत हा वाद थांबवला. मात्र, या खेळाडूंमध्ये नेमका कोणत्या कारणाने वाद झाला, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही, परंतु पंचांनी हे प्रकरण चिघळण्याअधीच सावरले. यापूर्वी याच मैदानावर खेळवल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहली आणि बेन स्टोक्स यांच्यात बाचाबाची झाली होती. तिसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूने पडद्याच्या गडबडीमुळे आपली फलंदाजी रोखली. त्यानंतरही विराट कोहली बेन स्टोक्सला काहीतरी मजेदार बोलला होता.

World Test Championship: ICCचं ट्विट होतंय जबरदस्त व्हायरल

चौथ्या सामन्यात भारताचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेलने जॅक क्रोली आणि डोमिनिक सिबलीला पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला तर मोहम्मद सिराजने इंग्लंडचा कर्णधार जो रुटची विकेट मिळवली. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या चार सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. चौथ्या कसोटीचा निकाल भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकतो की नाही, हे सांगेल. तिसरा कसोटी सामना गमावल्यानंतरच इंग्लंडचा संघ या स्पर्धेतून बाद झाला. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे.

संबंधित बातम्या