INDvsENG : "इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 'टीम इंडिया'च जिंकणार"

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ प्रबळ मानला जात आहे.

चेन्नई : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ प्रबळ मानला जात आहे. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड टीम इंडियाच्या विजयाचा अंदाज लावताना म्हणाले की, “इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत भारत 3-0 किंवा 4-0  ने विजयी होईल.”

“या मालिकेत भारतीय संघ प्रबळ असला, तरी इंग्लंडला श्रीलंकेत खेळलेल्या दोन कसोटी सामन्यांचा फायदा ही मालिका खेळताना होईल. जर मला मालिकेत या मालिकेत एखाद्या संघाला निवडावं लागलं, तर मी भारतीय संघाला निवडेल”, असेही डेव्हिड लॉयड म्हणाले. माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड यांनी भारतीय संघाचे विजयाचे वर्णन करताना भारतीय संघ हमखास जिंकणार, पण माझी भविष्यवाणी चुकीची ठरली तर मला आंनदच होणार असल्याचं म्हटलं आहे.

I-League 2021: पिछाडीवरून मुंबई सिटी विजयी

गेल्या काही कसोटी मालिकांमध्ये इंग्लंडने सातत्याने विजय मिळवला आहे. यादरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका कोण जिंकणार यापेक्षा कोण किती फरकाने जिंकणार यावर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा निकाल अवलंबून आहे. 18 जूनला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी असणार आहे. अंतीम स्पर्धेत न्यूझीलंड संघाचे स्थान निश्चित झाले आहे. भारत किंवा इंग्लंड यांच्यातील कोणता संघ खेळू शकतो हे या कसोटी मालिकेनंतर ठरणार आहे. त्यामुळे  क्रिकेट चाहत्यांचे लक्ष हे भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेवर आहे.

I-League 2021 : चर्चिल ब्रदर्सची ऐजॉलशी बरोबरी

भारत आणि इंग्लंड यांची मालिका बरोबरीत सुटली तर भारत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. भारता ऐवजी ऑस्ट्रेलिया फानलमध्ये पोहोचू शकते. त्याचबरोबर भारताने जर ही मालिका 2-1 फरकाने जिंकली, तर त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळू शकते.

संबंधित बातम्या