INDvsENG Test Series : पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात; इंग्लंडचा टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

ऑस्ट्रेलियाविरूद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडियाने दिमाखदार खेळ करत जिंकली. कांगारूंसोबतच्या अंतिम सामन्यात तीन विकेट्स राखून भारतीय संघाने कसोटी मालिका 2 - 1 ने आपल्या नावावर केली.

चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरूद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडियाने दिमाखदार खेळ करत जिंकली. कांगारूंसोबतच्या अंतिम सामन्यात तीन विकेट्स राखून भारतीय संघाने कसोटी मालिका 2 - 1 ने आपल्या नावावर केली. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला आज सुरूवात होणार आहे. पहिले दोन सामने चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. आजच्या कसोटी सामन्यातून विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि ईशांत शर्मा हे पुनरागमन करणार आहेत.

ऑस्ट्रेलिया सोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतला होता. मात्र त्यानंतर आता आज इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून विराट पुन्हा मैदानात उतरणार आहे. याशिवाय ईशांत शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. पण त्यानंतर इशांतने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत उतरत दर्जेदार कामगिरी केली आहे. आणि या पार्श्वभूमीवर इशांत शर्माने पुन्हा संघात प्रवेश केला आहे. तर हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेनंतर भारतात परतला होता. परंतु आता हार्दिक पांड्याही इंग्लंड बरोबरच्या कसोटी मालिकेत खेळणार आहे. 

गोव्याच्या दनुष्का दा गामा राष्ट्रीय बॉक्सिंग प्रशासनात; संयुक्त सचिवपदी निवड

ऑस्ट्रेलियात दौऱ्यानंतर टीम इंडिया आता इंग्लंडविरूद्ध सामन्यांची कसोटी मालिका भारतात खेळणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. तर उर्वरित दोन सामने अहमदाबादच्या नवीन सरदार वल्लभभाई पटेल (मोटेरा) स्टेडियमवर खेळण्याचे नियोजन आहे. 

बंगळूरसाठी महत्त्वाचा सामना; चेन्नईयीनला नमविल्यास प्ले-ऑफ फेरीची संधी कायम

“जर मला मालिकेत या मालिकेत एखाद्या संघाला निवडावं लागलं, तर मी भारतीय संघाला निवडेल”, असे इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड म्हणाले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने घेतला  आहे. पहिले दोन सामने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. केंद्र सरकारने क्रीडा स्थळांवर पन्नास टक्के क्षमतेसह प्रेक्षकांना उपस्थित राहण्यासंबंधी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

IPL मधील या महागड्या खेळाडूची विकेट पडली; गुपचूप चढला बोहल्यावर

 टीएनसीए आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमधील बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने क्रीडा स्थळांवर गर्दी करण्यास परवानगी देणाऱ्या कोविड 19 च्या मार्गदर्शक सूचनांनंतर दुसर्‍या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीसाठी प्रेक्षकांना परवानगी देण्याच्या विषयावर चर्चा केली, बीसीसीआय आणि टीएनसीएने दुसर्‍या कसोटीसाठी 50 टक्के प्रेक्षकांना सर्व सुरक्षा प्रोटोकॉल पाळून परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) विनंती केली होती की खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बंद दाराच्या मागे सामने खेळले जावेत. एमए चिदंबरम स्टेडियमची क्षमता 50,000 आहे.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, आर अश्विन , कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, आझर पटेल.

इंग्लंड संघ : जो रूट, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जेम्स अँडरसन, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर (केवळ पहिल्या कसोटीसाठी), झॅक क्रॉली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वॉक्स

सामन्याची वेळ – सकाळी 9:30

संबंधित बातम्या