IND Vs ENG : अम्पायरच्या 'त्या' निर्णयामुळे विराट कोहलीचा पारा चढला

IND Vs ENG : अम्पायरच्या 'त्या' निर्णयामुळे विराट कोहलीचा पारा चढला
India Vs England Virat Kohli gets angry over umpires decision to make Root not out

नवी दिल्ली :  चेन्नई कसोटीच्या तिसर्‍या दिवशी टीम इंडियाने वर्चस्व राखले आणि आता ते विजयापासून अवघ्या 7 विकेट दूर आहे. चेन्नई कसोटीच्या तिसर्‍या दिवशी आर अश्विन आणि विराट कोहलीने जबरदस्त फलंदाजी केली. विशेषतः कसोटी कारकीर्दीतील पाचवे शतक झळकावणाऱ्या आर अश्विनने. त्याचवेळी विराट कोहलीनेही अर्धशतक झळकावून कठीण परिस्थितीत 62 धावा केल्या. मात्र, दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या क्षणी विराट कोहली खूप चिडला. विराट कोहलीचा पारा इतका वाढला की त्याने पंचांशी वाद सुरू केले.

विराट कोहलीच्या रागाचे कारण म्हणजे तिसर्‍या पंचांचा निर्णय होता. दुसऱ्या  डावादरम्यान, जो रुटने मारलेल्या फटक्यावर तो एलबीडब्ल्यू आऊट असल्याचं अपील करण्यात आलं. पंचांनी नॉट आऊटचा निर्णय दिल्याने विराट कोहलीने डीआरएसचा वापर केला. तिसर्‍या पंचांना रिप्लेमध्ये सापडले की चेंडूने रूटच्या बॅटला स्पर्श केलेला नव्हता. मात्र, त्यानंतर पंचने एलबीडब्ल्यू तपासला तेव्हा बॉल हा बॅटच्या आगदी जवळून जात विकेट्स हिट करत गेला.

परंतु तरीही तिसऱ्या पंचांनीदेखील नॉट आऊटचाच निर्णय कायम ठेवला. इतकेच नव्हे, तर कोच रवी शास्त्रीदेखील पॅव्हेलियनमधून हा चुकीचा निर्णय असल्याचे सांगत होते. पंचाच्या या निर्णयामुळे विराट कोहली खूप चिडला आणि त्याने पंचांशी वाद घालण्यास सुरवात केली. हे संभाषण सुमारे 30 ते 40 सेकंद चालू राहिले. विराट कोहली पंचांशी वाद घालताना पाहून माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आपली प्रतिक्रीया दिली. त्याने विराट कोहलीच्या या कृतीला चुकीचे म्हटले आणि म्हटले की तिसऱ्या पंचांनी जेव्हा निर्णय दिला असेल तेव्हा ऑन फील्ड पंचांशी वाद घालण्याचा काही उपयोग नाही.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com