IND vs IRE: अर्शदीप सिंग करणार पदार्पण, धोनी-हार्दिकला बसला होता फटका

युवा खेळाडूंसाठी भारताचा आयर्लंड दौरा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या दौऱ्यातील संघाची कमान हार्दिक पांड्याकडे असेल.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Team India Tour Of Ireland: युवा खेळाडूंसाठी भारताचा आयर्लंड दौरा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या दौऱ्यातील संघाची कमान हार्दिक पांड्याकडे असणार आहे. पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा वेगवान गोलंदाजांना पदार्पणाची संधी मिळू शकते. हे खेळाडू जसप्रीत बुमराहसारखी घातक गोलंदाजी करण्यात पटाईत आहे. (india vs ireland arshdeep singh team india probable playing xi in 1st t20)

हा खेळाडू पदार्पण करु शकतो

दक्षिण आफ्रिकेनंतर (South Africa) आयर्लंड मालिकेसाठीही मालिकेसाठी युवा खेळाडू निवडकर्त्यांची पहिली पसंती ठरले आहेत. या मालिकेत अर्शदीप सिंगला हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. त्याने आयपीएलमध्ये (IPL) शानदार गोलंदाजी केली होती. बड्या-बड्या फलंदाजांना त्याने गारद केले होते. अर्शदीप शेवटच्या षटकांमध्ये बुमराहसारखा अचूक यॉर्कर टाकण्यात पटाईत आहे.

Team India
IND vs SA: T20 मालिकेची उत्कंठा शिगेला पण सामन्यावर पावसाचे संकट

सीझन 15 मधील संस्मरणीय कामगिरी

आयपीएलच्या 15 व्या मोसमात अर्शदीप सिंगचे वर्चस्व होते. या मोसमात त्याने अचूक यॉर्कर चेंडू टाकण्याच्या बाबतीत जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजालाही मागे टाकले. या मोसमात 14 सामने खेळून त्याने 7.70 च्या इकॉनॉमीने 10 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंगने 2019 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. अर्शदीपने आयपीएलमध्ये आतापर्यंत 37 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 8.35 च्या इकॉनॉमीने 40 विकेट्स घेतल्या आहेत.

Team India
Ind vs Sa: भारताचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिकेने 4 विकेटने जिंकला सामना

टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर

हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com