IND vs NZ: धोनीसमोरच विकेटकीपर ईशान किशनची चपळाई, डायरेक्ट हिटवर ब्रेसवेल रनआऊट; Video

Video: ईशान किशनने चपळाई दाखवत मायकल ब्रेसवेलला डायरेक्ट हिटवर रनआऊट केले.
Ishan Kishan run out Michael Bracewell
Ishan Kishan run out Michael Bracewell Dainik Gomantak

India vs New Zealand, 1st T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी20 मालिकेला सुरुवात झाली असून शुक्रवारी या मालिकेती पहिला सामना पार पडला. रांचीमध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय युवा यष्टीरक्षक ईशान किशनकडून चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळाले.

चपळाईने ब्रेसवेलला धाडले माघारी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवे बाद झाल्यानंतर मायकल ब्रेसबेल फलंदाजीसाठी आला होता. वनडे मालिकेत शानदार कामगिरी केलेला ब्रेसवेल टी20 मालिकेतही भारतासाठी डोकेदुखी ठरणार का असा प्रश्न चाहत्यांना होता. मात्र, ईशानने चपळाईने त्याला माघारी धाडले.

Ishan Kishan run out Michael Bracewell
MS Dhoni: धोनी...धोनी...! 'लोकल बॉय'ची झलक पाहून चाहते दंग; कॅप्टनकूलकडूनही मिळाला प्रतिसाद; Video

झाले असे की 18 व्या षटकात अर्शदीप सिंग गोलंदाजी करत होता. याच षटकात त्याने दुसऱ्या चेंडूवर कॉनवेला बाद केले होते. त्यामुळे ब्रेसवेल फलंदाजीला आला होता. त्याच्या साथीला फलंदाजीला डॅरिल मिशेल होता.

दरम्यान अर्शदीपने या षटकातील टाकलेल्या पाचव्या चेंडूवेळी मिशेल फटका खेळण्यास चूकला. त्यामुळे चेंडू मागे गेला. पण यावेळी मिशेल आणि ब्रेसवेलने एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, यष्टीरक्षक ईशानने चपळाईने चेंडू पकडला आणि स्ट्रायकर एन्डच्या दिशेने जोरात फेकला. तो चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. जेव्हा चेंडू स्टंप्सवर आदळला, तोपर्यंत ब्रेसवेल क्रिजमध्ये पोहचला नव्हता. त्यामुळे ब्रेसवेलला एका धावेवरच विकेट गमवावी लागली.

(Ishan Kishan run out Michael Bracewell on Direct Hit)

विशेष म्हणजे हा सामना पाहाण्यासाठी भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीही स्टेडियममध्ये उपस्थितीत होता. धोनी यष्टीरक्षणावेळी दाखवत असलेल्या चपळाईसाठी ओळखला जातो. आता त्याच्याच समोर ईशानने चपळाई दाखवत धावबाद केल्याने चाहते त्याचे कौतुक करत विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Ishan Kishan run out Michael Bracewell
IND vs NZ, 1st T20I: हवेत झेपावत वॉशिंग्टनने पकडला 'सुंदर' कॅच, पाहा Video

कॉनवे - मिशेलची अर्धशतके

दरम्यान, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. त्यामुळे न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या. त्यांच्याकडून कॉनवेने 35 चेंडूत 52 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारले.

तसेच डॅरिल मिशेलने 30 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 59 धावा केल्या. याशिवाय फिन ऍलेनने महत्त्वपूर्ण 23 चेंडूत 35 धावांची खेळी केली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com