India vs New Zealand: दुसऱ्या वनडेत किवींना चॅलेंज देण्यासाठी टीम इंडिया सज्ज, जाणून घ्या Playing XI

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रायपूरला शनिवारी दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे.
Rohit Sharma | Tom Latham
Rohit Sharma | Tom LathamDainik Gomantak

India vs New Zealand, 2nd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शनिवारी वनडे मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. हा सामना रायपूरमधील  शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताने या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत खेळलेले खेळाडूच दुसऱ्या वनडेतही भारताकडून खेळताना दिसतील.

तसेच न्यूझीलंडने देखील त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. त्यामुळे पहिल्या वनडेत भारताविरुद्ध खेळलेले 11 खेळाडूच दुसऱ्या वनडेतही न्यूझीलंडकडून मैदानात उतरतील.

Rohit Sharma | Tom Latham
Team India: चेतेश्वर पुजाराने केला महारेकॉर्ड, कसोटी मालिकेपूर्वीचं ऑस्ट्रेलियन संघात घबराट!

भारताला विजयी आघाडीची संधी

भारतीय क्रिकेट संघाने हैदराबादला झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकला होता. त्यामुळे भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.

त्यामुळे आता भारतीय संघाला दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. तसेच न्यूझीलंडही दुसरा वनडे सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाच्या हेतूने मैदानात उतरतील. जर दुसरा सामना न्यूझीलंडने जिंकला, तर इंदोरला होणारा तिसरा वनडे सामना निर्णायक ठरेल.

Rohit Sharma | Tom Latham
IND vs NZ: पहिल्या वनडेतील ती चूक टीम इंडियाला महागात, ICCकडून मोठी कारवाई

दुसऱ्या वनडेसाठी असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

न्यूझीलंड संघ - फिन ऍलेन, डेवॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिएल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिशेल सँटेनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com