IND vs NZ: संधी मिळताच चहलची जादू चालली, किवी ओपनरची विकेट ठरली रेकॉर्डब्रेक

युजवेंद्र चहलने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यादरम्यान मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
Yuzvendra Chahal
Yuzvendra ChahalDainik Gomantak

India vs New Zealand: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी टी20 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. लखनऊमध्ये पार पडलेल्या या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यासाठी भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल यालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. त्यानेही या संधीचा फायदा घेत मोठा विक्रम रचला आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम गोलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारतीय गोलंदांनाही या संधीचा फायदा घेत सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी करत न्यूझीलंडला 20 षटकात 8 बाद 99 धावांवर रोखले.

भारताकडून चहलनेच न्यूझीलंडल पहिला मोठा धक्का दिला होता. त्याने चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ऍलेनला 11 धावांवर त्रिफळाचीत केले. ही चहलसाठी विक्रमी विकेट ठरली.

Yuzvendra Chahal
IND vs NZ, 2nd T20I: टीम इंडियाचा रडतखडत विजय! शंभरीसाठीही किवी गोलंदाजांनी सतवलं

फिन ऍलेनला बाद करताच चहल भारताकडून आंरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने याबाबतीत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला मागे टाकले.

चहलच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता 75 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात आता 91 विकेट्सची नोंद झाली आहे. तसेच भुवनेश्वरच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 90 विकेट्स आहेत.

तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या जगातील एकूण गोलंदाजांमध्ये चहल 11 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या 10 क्रमांकामध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजांचा समावेश नाही. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम सध्या न्यूझीलंडच्या टीम साऊदीच्या नावावर असून त्याने 134 विकेट्स घेतल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज -

91 विकेट्स - युजवेंद्र चहल (75 सामने)

90 विकेट्स - भुवनेश्वर कुमार (87 सामने)

72 विकेट्स - आर अश्विन (65 सामने)

70 विकेट्स - जसप्रीत बुमराह (60 सामने)

65 विकेट्स - हार्दिक पंड्या (86 सामने)

(Yuzvendra Chahal has become India's highest wicket-taker in T20Is)

Yuzvendra Chahal
IND vs NZ: नो-बॉलपासून अर्शदीपची सुटका होईना, आता 'हा' नकोसा विक्रमही झाला नावावर

भारताचा विजय

रविवारी झालेल्या सामन्यात भारताने 100 धावांच्या आव्हानाचा पाठलाग अखेरच्या षटकात एक चेंडू राखून आणि 4 विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक २६ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त कोणीही 20 धावांचा टप्पा पार केला नाही. न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेल आणि ईश सोधी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी न्यूझीलंडच्या कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा पार करत आला नाही. त्यांच्याकडून कर्णधार मिशेल सँटेनरने सर्वाधिक 19 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक हुडा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com