IND vs NZ: भारताविरुद्धच्या वनडे अन् टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा !

IND vs NZ T20 Series 2022​: न्यूझीलंड दौऱ्यावर भारताला 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे.
New Zealand
New ZealandDainik Gomantak

IND vs NZ T20 Series 2022​: न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर भारताला 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. भारताविरुद्धच्या या मोठ्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघात अनेक धोकादायक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, ज्यांच्यामध्ये एकहाती सामना जिंकण्याची क्षमता आहे.

भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर करण्यात आला

केन विल्यमसन भारताविरुद्धच्या (India) टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला न्यूझीलंडच्या टी-20 आणि एकदिवसीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याशिवाय किवी सलामीवीर मार्टिन गुप्टिललाही वनडे आणि टी-20 संघातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

New Zealand
IND vs NZ : या महिन्यात रंगणार Team India आणि New Zealand मध्ये सामना; हे आहे वेळापत्रक

या खेळाडूंचा पत्ता कट

खराब फॉर्ममुळे मार्टिन गुप्टिलला न्यूझीलंड संघातून वगळण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकात (T20 World Cup) मार्टिन गुप्टिलला एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली गेली नाही. मार्टिन गुप्टिलच्या जागी आता फिन ऍलनची न्यूझीलंडच्या (New Zealand) वनडे आणि टी-20 संघात सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे.

भारतात अनेक जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू आहेत

वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिल्नेही भारताविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंड संघात परतला आहे. वेगवान गोलंदाज काइल जेमिसनला दुखापतीमुळे टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंड संघात स्थान मिळालेले नाही. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, 'भारतात अनेक जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू आहेत. टीम इंडिया जेव्हा-जेव्हा न्यूझीलंडच्या दौऱ्यावर येते तेव्हा-तेव्हा चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करते.'

New Zealand
IND vs NZ Warm-Up: आज टीम इंडियाचा दुसरा सराव सामना, न्यूझीलंडविरुद्ध भिडणार

भारताविरुद्धच्या T20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे (विकेटकीपर), लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अ‍ॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, ब्लेअर टिकनर.

New Zealand
IND vs NZ: मुंबई कसोटीत रविचंद्रन अश्विन करणार 'ट्रिपल सेंच्युरी'

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ

केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अ‍ॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, टॉम लॅथम (विकेटकीपर), मॅट हेन्री.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com