IND vs PAK: विराट-केएलच्या शानदार खेळीवर क्रिकेटच्या देवाने उधळली स्तुतीसुमने, टीम इंडियासाठी...

Asia Cup 2023: आशिया कप 2023 च्या सुपर 4 चा तिसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कोलंबो येथे खेळवला जात आहे.
Virat Kohli & KL Rahul
Virat Kohli & KL Rahul Dainik Gomantak

Sachin Tendulkar Congratulate Virat Kohli KL Rahul: आशिया कप 2023 च्या सुपर 4 चा तिसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कोलंबो येथे खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने तूफानी फलंदाजी केली. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शानदार फलंदाजी करत शतके झळकावली.

दरम्यान, KL ने शानदार पुनरागमन करत 106 चेंडूत 12 चौकार 2 षटकारांसह नाबाद 111 धावा केल्या, तर दुसरीकडे विराट कोहलीने 94 चेंडूत 9 चौकार 3 षटकारांसह नाबाद 122 धावा केल्या.

यासह विराटने वनडेमध्ये सर्वात जलद 13 हजार धावा पूर्ण करत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. या शानदार खेळीबद्दल सचिनने केएल आणि कोहलीचे अभिनंदन केले आहे.

सचिनने ट्विट करत म्हटले की, 'विराट आणि केएलला त्यांच्या शतकांसाठी अभिनंदन.' यासोबत त्याने वनडे वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियासाठी (Team India) एक मोठी गोष्ट सांगितली.

Virat Kohli & KL Rahul
IND vs PAK: राखीव दिवशीही पावसाचा खोडा, पाकिस्तानविरुद्ध सामना पुन्हा रद्द झाला, तर काय होणार?

त्याने पुढे लिहिले - टीम इंडियासाठी एक मोठा सकारात्मक संकेत म्हणजे सर्व टॉप 6 फलंदाज - रोहित, शुभमन, विराट, केएल, इशान आणि हार्दिक यांनी 2 सामन्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर धावा केल्या आहेत. खूप छान! हे सुरु ठेवा...

Virat Kohli & KL Rahul
IND vs PAK: कोलंबोमध्ये धावांचा पाऊस, केएल-कोहलीचे झंझावाती शतक; पाकिस्तानसमोर 357 धावांचे आव्हान

टीम इंडियाला हा फॉर्म कायम ठेवावा लागणार

पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) सामन्यानंतर टीम इंडियाचा सामना 12 सप्टेंबरला श्रीलंका आणि 14 सप्टेंबरला बांगलादेशशी होणार आहे. यानंतर 17 सप्टेंबरला आशिया कपचा अंतिम सामना होणार आहे. आशिया कपनंतर टीम इंडिया वनडे वर्ल्डकपची तयारी सुरु करणार आहे.

सध्या पाकिस्तानसारख्या संघाविरुद्ध भारतीय फलंदाजांची कामगिरी दमदार दिसत आहे. मात्र, हा फॉर्म टीम इंडिया कितपत कायम ठेवते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com