मुंबईकर शार्दुलवर नेटकरी फिदा; पंजाब किंग्जचं ट्विट व्हायरल

शार्दुल ठाकूरने जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या डावात 7 विकेट घेत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
India vs SA Shardul Thakur

India vs SA Shardul Thakur

Dainik Gomantak

शार्दुल ठाकूरने (shardul thakur) जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या डावात 7 विकेट घेत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. बॉलिंगशिवाय बॅटिंगनंही त्याने लक्ष्य वेधून घेतलं. सोशल मीडियावर त्याच्या अष्टपैलू खेळीवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. अष्टपैलू म्हणून खेळणारा शार्दुल ठाकूर दक्षिण आफ्रिकेत एका डावात 7 बळी घेणारा पहिला आशियाई गोलंदाज ठरला आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (INDvsSA) एका डावात सर्वोत्तम गोलंदाजीचा भारतीय विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. शार्दुल ठाकूरने पहिल्या डावात 61 धावांत 7 बळी घेतले. यापूर्वी हा विक्रम रविचंद्रन अश्विनच्या नावावर होता. अश्विनने 2015 मध्ये नागपुरात झालेल्या सामन्यामध्ये 66 धावांत 7 विकेट घेतल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध शार्दुल ठाकूरनं जी कामगिरी दाखवली ती कमालीची आहे. त्याच्या या कामगिरीवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यामध्ये आयपीएलमधील पंजाब किंग्ज संघाचाही समावेश आहे. पंजाब किंग्जने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक खास ट्विट करून शार्दूलचे कौतूक केले आहेत. पंजाबने कपिल देव आणि 1983 वर्ल्ड कप विजेत्या मालिकेच्या इतिहासाला उजाळा देणाऱ्या चित्रपटातील कपिल देव यांची भूमिका साकारणाऱ्या रणविर सिंगचा फोटो शेअर केला. आणि या फोटोला यश तलवार निकाल, असं धमाकेदार कॅप्शन दिल्याने हे ट्विट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

<div class="paragraphs"><p>India vs SA Shardul Thakur </p></div>
Pro Kabaddi 8: प्रदीप नरवालने प्रो कबड्डी लीगमध्ये रचला इतिहास

1983 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयात अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांचा मोठा वाटा होता. झिम्बाब्वे विरुद्ध त्यांनी 'करो वा मरो'च्या लढतीत 183 धावांची खेळी केली होती. मात्र बीबीसीच्या त्यावेळी झालेल्या संपामुळे या सामन्याचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध नाहीत. मात्र 83 या चित्रपटातून क्रिकेटप्रेमींना त्या सामन्याची झलक बघायला मिळाली. या चित्रपटाच्या माध्यमातून कपिल पाजींची ही ऐतिहासिक खेळी चाहत्यांसमोर आली. त्याखेळीत कपिल पाजींनी मूंगस बॅट वापरुन झिम्बाब्वेची जोरदार धुलाई केली होती. चित्रपटात हा सीन दाखनताना रणवीरचा एक हटके डायलॉग आहे. त्यात यश (यशपाल शर्मा) तलवार निकाल, असे म्हणत रणवीर कपूर (कपिल देव) बॅट बदलून घेत मैदानात उतरल्याचे दाखवण्यात आले. आणि त्याच सिनचा संदर्भ देत पंजाबने शार्दुलसंदर्भात केलेले ट्विट भारतीय क्रिकेट टिमला एक चांगला अष्टपैलू मिळाल्याचे संकेत देणारा ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील भारतीय गोलंदाजाचे सर्वोत्तम विक्रम

शार्दुल ठाकूर 61/7 2022

हरभजन सिंग120/7 2011

अनिल कुंबळे 53/6 1993

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यातील विक्रमी आकडे

शार्दुल ठाकूर 61/7 2022

आर. अश्विन 66/7 2016

हरभजन सिंग 87/7 2005

याआधी शार्दुल ठाकूरने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कधीही एका डावात 7 बळी घेतले नव्हते. या कामगिरीपूर्वी शार्दुल ठाकूरची फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 31 धावांत 6 बाद 6 अशी सर्वोत्तम कामगिरी होती. शार्दुलने कर्णधार डीन एल्गर आणि कीगन पीटरसन यांची भागीदारी मोडीत काढत पहिली विकेट घेतली होती. या विकेटनंतर शार्दुल ठाकूरने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला आणि 3 बळी घेतले.

<div class="paragraphs"><p>India vs SA Shardul Thakur </p></div>
IND vs SA: ऋषभ पंतने रचला इतिहास,धोनीला टाकले मागे

शार्दुल ठाकूरचा हा स्पेल भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा ठरला. शेवटी दक्षिण आफ्रिकेचा डाव 229 धावांवर आटोपला आणि आघाडी केवळ 27 धावांवरच मर्यादित राहिली. भारतीय संघाकडून शार्दुल ठाकूरशिवाय मोहम्मद शमीने 2 आणि जसप्रीत बुमराहने 1 बळी घेतले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com