IND Vs SA: पहिल्या वनडेबाबत आली ही मोठी अपडेट, टीम इंडियााची होऊ शकते निराशा

India vs South Africa, 1st ODI Match: सामन्यापूर्वी ही बातमी टीम इंडियाचीही निराशा करु शकते.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India vs South Africa, 1st ODI Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना उद्या दुपारी दीड वाजल्यापासून लखनौमध्ये खेळवला जाणार आहे. टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेला 2-1 ने पराभूत केल्यानंतर आता टीम इंडियाला वनडे मालिकेतही पाहुण्या संघाचा पराभव करायचा आहे. मात्र, पहिल्या वनडे सामन्याबाबत एक मोठी अपडेट येत आहे. सामन्यापूर्वी ही बातमी टीम इंडियाचीही निराशा करु शकते.

पहिल्या वनडेबाबत ही अपडेट आली

खरे तर, लखनौमध्ये भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात पावसामुळे अडथळा येऊ शकतो. बुधवारी, सामन्याच्या एक दिवस आधी, लखनौमध्ये मुसळधार पावसाने दार ठोठावले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, लखनौमध्ये सामन्याच्या दिवशी म्हणजेच 6 ऑक्टोबरला दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या वनडे सामन्यावर पावसाचा परिणाम होऊ शकतो.

Team India
IND vs SA: दिनेश कार्तिकला नंबर-4 वर का पाठवले? राहुल द्रविडने सांगितले कारण

सामन्यापूर्वी टीम इंडिया निराश होऊ शकते

याआधी 2020 मध्ये कोविड-19 महामारीमुळे लखनौमध्ये खेळलेला टी-20 सामनाही रद्द करावा लागला होता. त्यावेळीही हा सामना दक्षिण आफ्रिकेशीच होणार होता. लखनौच्या (Lucknow) एकना स्टेडियमच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, 'सामन्यादरम्यान पाऊस पडला नाही तर कोणतीही अडचण येणार नाही.'

Team India
IND Vs SA: भारताने क्लीन स्वीपची संधी गमावली; तिसऱ्या सामन्यात आफ्रिकेची आघाडी

हे मोठे अपडेट समोर आले

स्टेडियमचे मालक उदय सिन्हा यांनी सांगितले की, एकना स्टेडियमची पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था अत्याधुनिक आहे. पावसाचे पाणी केवळ 30 मिनिटांत मैदानातून बाहेर काढून खेळण्यायोग्य मैदान केले जाऊ शकते. प्रथमच, भारतीय संघ लखनौच्या एकना स्टेडियमवर एकदिवसीय सामना खेळणार आहे. यापूर्वी भारताने येथे वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध टी-20 सामने खेळले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com