IND vs SA: भारताच्या B संघानं आफ्रिकेची उडवली झोप, केशव महाराजचं मोठं वक्तव्य

India vs South Africa: भारताचा ब संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळत आहे.
South Africa
South AfricaDainik Gomantak

India vs South Africa 2nd Odi Match: भारताचा ब संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळत आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला जागतिक दर्जाचे संबोधताना, दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज म्हणाला की, एकावेळी चार ते पाच आंतरराष्ट्रीय संघांना मैदानात उतरवण्याची क्षमता भारताकडे आहे. मात्र, दोन्ही संघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

केशव महाराजाने ही मोठी गोष्ट सांगितली

कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघ आगामी T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियात आहे, त्यामुळे भारताचे पर्यायी खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भाग घेत आहेत. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी केशव महाराज म्हणाला की, 'मी याला दुसऱ्या स्तराचा भारतीय संघ म्हणणार नाही. भारताकडे (India) इतके टॅलेंट आहे, की ते चार-पाच आंतरराष्ट्रीय संघ उभे करु शकतात.' संघातील अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात आणि त्यांना आंतरराष्ट्रीय अनुभवही आहे. हे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करणारे ठरणार आहेत.

South Africa
IND Vs SA: पहिल्या वनडेबाबत आली ही मोठी अपडेट, टीम इंडियााची होऊ शकते निराशा

टीम इंडियाकडे जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत

भारतीय संघाला गुरुवारी तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्याचवेळी, टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील पाहुण्या संघाने दौऱ्याच्या सुरुवातीलाच टी-20 मालिका 1-2 ने गमावली.

महाराज पुढे म्हणाला की, 'भारताविरुद्ध अधिक चांगली कामगिरी करणे केव्हाही चांगले. अर्थात, तुम्हाला स्वतःला तयार करायचे आहे. त्यांच्याकडे जागतिक दर्जाची फलंदाज आहे.' T20 क्रमवारीत जगातील अव्वल गोलंदाज तबरेझ शम्सीने लखनौमध्ये शानदार कामगिरी केली.

South Africa
IND vs SA: दिनेश कार्तिकला नंबर-4 वर का पाठवले? राहुल द्रविडने सांगितले कारण

दुसरीकडे, पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने आठ षटकात 89 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. महाराज डावखुऱ्या फिरकीपटूचा बचाव करताना म्हणाला की, 'मला वाटत नाही की तो दिवस त्यांच्यासाठी वाईट होता. एखादी व्यक्ती कशी गोलंदाजी करतो हे आकडेवारी तुम्हाला सांगता येत नाही.'

South Africa
IND vs SA: 'हिटमॅन' ची सिंहगर्जना! एकाच सामन्यात बनवले 2 रेकॉर्ड, विराट-धोनीला टाकले मागे

दुसरा एकदिवसीय सामना रांचीत होणार

मालिकेतील दुसरा सामना रांचीत खेळवला जाणार आहे. महाराजला महेंद्रसिंग धोनीविषयी (Mahendra Singh Dhoni) विचारले असता तो म्हणाला की, मला महान खेळाडूंशी संवाद साधायला आवडते. महाराज पुढे म्हणाला की, 'मला त्यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली नाही. पण मला त्यांच्याशी संवाद साधायला आवडेल. विशेषत: नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून ते सर्वोत्तम खेळाडू आहेत. ते मैदानावर खूप शांत राहतात. त्यांच्याकडून तुम्ही खूप काही शिकू शकता.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com