IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल खेळणार नाही! या फलंदाजाला रोहित देणार संधी

India vs South Africa: T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दोन सामने जिंकले आहेत.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

India vs South Africa ICC T20 World Cup 2022: T20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाने दोन सामने जिंकले आहेत. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव केला होता. यानंतर नेदरलँडचा पराभव केला. आता 30 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्माला कोणतीही कसर सोडायला आवडणार नाही. अशा परिस्थितीत तो प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करु शकतो. केएल राहुलऐवजी एका स्टार खेळाडूला संधी देऊ शकतो. त्याच्याबद्दल जाणून घेऊया.

केएल राहुलला मिळणार विश्रांती!

स्टार सलामीवीर फलंदाज केएल राहुल टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) 2022 मध्ये फ्लॉप ठरला. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जेव्हा त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा तेव्हा तो म्हणावी तशी कामगिरी करु शकला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने केवळ 4 धावा केल्या होत्या. त्याचवेळी नेदरलँड्सविरुद्ध त्याने 9 धावांची खेळी केली. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

Rohit Sharma
IND Vs SA: टीम इंडियाच्या या गोलंदाजाने आफ्रिकन संघांला केले चारी मुंड्या चीत!

या खेळाडूला संधी मिळू शकते

केएल राहुलला विश्रांती मिळाल्यास त्याच्या जागी स्फोटक फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) संधी मिळू शकते. पंतने याआधी टीम इंडियासाठी सलामी दिली आहे.

Rohit Sharma
IND vs SA 3st ODI: भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट

पहिल्या T20 विश्वचषकात संघाचा भाग होता

2007 साली भारतीय संघाने एकमेव T20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर दिनेश कार्तिक विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. यावेळी तो वयाच्या 37 व्या वर्षी टीम इंडियात परतला आहे. यामध्ये त्याने टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका बजावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com