IND vs SA T20: आज भारत भिडणार द.आफ्रिकेशी, पाहा कुठं रंगणार सामन्याचा थरार?

T20 World Cup 2022: भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 4.30 वा. सुरू होईल.
T20 World Cup 2022
T20 World Cup 2022Dainik Gomantak

टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला आहे. भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेशी (IND vs SA) भडणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पर्थ क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येकी दोन सामने खेळला आहे. भारताने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेचा एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि दुसऱ्या सामन्यात त्यांनी बांगलादेशविरुद्ध मोठा विजय मिळवला होता. 

या स्पर्धेत भारत आण दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. भारतीय संघातील टॉप ऑर्डर आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी मागील सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताची (India) वेगवान गोलंदाजीही अप्रतिम आहे. दुसरीकडं, दक्षिण आफ्रिकेचा टॉप ऑर्डरही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. क्विंटन डी कॉक आणि रिली रोसो आक्रमक खेळी करत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही विरुद्ध संघातील फलंदाजाच्या नाकी नऊ आणले आहेत. दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा 104 धावांनी पराभव केला.

T20 World Cup 2022
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल खेळणार नाही! या फलंदाजाला रोहित देणार संधी
  • कुठं पाहणार सामना

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर-12 मधील सामना रविवारी 30 ऑक्टोबर रोजी पर्थ क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 4.30 वा. सुरू होईल. अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल. भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येईल, जिथे विविध भाषांमध्ये कॉमेन्ट्री ऐकायला मिळू शकते. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर (Hotstar App) पाहू शकतात. तसेच टी-20 विश्वचषकाच्या संबंधित ताज्या बातम्या वाचण्यासाठी तुम्ही एबीपी माझावर वेबसाईटवर भेट देऊ शकतात.

  • भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, ऋषभ पंत, दीपक हुडा, हर्षल पटेल , युजवेंद्र चहल.

  • दक्षिण आफ्रिकेचा संघ

क्विंटन डी कॉक (विकेटकिपर) टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रोसो, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नार्खिया, तबरेझ शाम्सी, लुंगी एनगिडी, हेनरिक क्लासेन, मार्को जॅन्सन, रीझा हेंड्रिक्स.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com