India vs Sri Lanka: WTC Final मध्ये पराभवानंतर क्रिकेट प्रेमींचं लक्ष्य भारताच्या युवा फळीकडे

श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) टीम इंडियाचं नेतृत्व शिखर धवन (Shikhar Dhawan) करणार आहे तर संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) राहील
श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) टीम इंडियाचं नेतृत्व शिखर धवन (Shikhar Dhawan) करणार आहे तर संघाचं प्रशिक्षकपद राहुल द्रविड यांच्याकडे राहील
श्रीलंका दौऱ्यासाठी (India vs Sri Lanka) टीम इंडियाचं नेतृत्व शिखर धवन (Shikhar Dhawan) करणार आहे तर संघाचं प्रशिक्षकपद राहुल द्रविड यांच्याकडे राहीलTwitter/@BCCI

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) मध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पराभव स्वीकारल्यानंतर क्रिकेट प्रेमींचे लक्ष्य आता भारताच्या श्रीलंका दौऱ्या (India vs Sri Lanka) वर असणार आहे. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर २९ जून ला रवाना झाला. या संघाचे प्रशिक्षकपद राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याकडे आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध प्रत्येक तीन सामन्यांची वनडे आणि टी-२० मालिका येत्या १३ जुलै पासून खेळणार आहे.

(India vs Sri Lanka: After defeat in WTC Final, all eyes set on young brigade)

श्रीलंकेविरुद्ध टी-२० मध्ये कामगिरी बघितली तर भारतीय संघ प्रबळ दिसतो. भारत आणि लंके मध्ये आत्तापर्यंत १९ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी १३ सामन्यांमध्ये भारताने १९ विजय मिळवले आहेत तर ५ श्रीलंकेने जिंकले आहेत तर एका सामना अनिर्णयीत राहिला आहे.

या दौऱ्यातभारताने फलंदाजाच्या यादीत अनुभवी शिखर धवन बरोबर युवा देवदत्त पडिकल, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, मनीष पांडे, नितीश राणा, इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या आणि के गौतम हे ऑलराउंडरच्या भूमिकेत दिसतील गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, दीपक चहर, चेतन सकारिया, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चहर आणि वरुण चक्रवर्ती यांच्यावर असेल.

युवा खेळाडूंना घेऊन राहुल द्रविड लंकेत उतरतील. द्रविड यांनी २०१९ मध्ये भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे प्रशिक्षकपदी होते. त्यांनी या संघाला २०१९ चा विश्वचषक जिंकवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. आता मात्र द्रविड यांच्यावर एक मोठी जवाबदारी बीसीसीआय ने दिली आहे. श्रीलंका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धवन आणि प्रशिक्षक द्रविड़ यांची संयुक्त पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यात बोलताना प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताचे युवा लंकेत उत्कृष्ट कामगिरी करतील असा विश्वास कर्णधार शिखर धवन याने व्यक्त केला आहे. खेळाडू दौऱ्यासाठी उत्साहित असून नव्या आव्हानांसाठी सज्ज असल्याचंही धवन पुढे म्हणाला.

असा असेल हा दौरा:

वन डे मालिका (सर्व सामने कोलंबो)

-पहिला एकदिवसीय सामना: 13 जुलै

- दुसरा एकदिवसीय सामना: 16 जुलै

- तिसरा एकदिवसीय सामना: 18 जुलै

टी-20 मालिका (सर्व सामने कोलंबो)

- पहिला टी-20 सामना: 21 जुलै

- दुसरा टी-20 सामना: 22 जुलै

- तिसरा टी -20 सामना: 25 जुलै

भारताचा संघ

शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीकल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, ईशन किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के. गौतम, क्रुणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com