मायकेल वॉन म्हणतोय भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिन्ही मालिका हरणार..

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ तिन्ही प्रकारातील मालिका गमावेल, असे भाकीत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने केले आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील भारतीयांच्या कामगिरीवरून वॉनने हे भाष्य केले आहे.

सिडनी :  ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ तिन्ही प्रकारातील मालिका गमावेल, असे भाकीत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने केले आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील भारतीयांच्या कामगिरीवरून वॉनने हे भाष्य केले आहे.

भारतीय संघ नऊ महिन्यांनंतर पहिला एकदिवसीय सामना खेळत असला तरी संघातील खेळाडूंकडे दोन महिन्यांच्या आयपीएलचा अनुभव होता, तरीही पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ३७४ धावांचा खुराक ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दिला. भारतीय संघाच्या या कामगिरीवर वॉनने टीका केली, माझे हे विधान घाईघाईने केले असे अनेकांना वाटेल, परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्धच्या तिन्ही मालिका जिंकेल, असे ट्‌विट वॉनने केले आहे.

निर्धारित षटके पूर्ण करण्यासाठी भारतीयांनी घेतलेला वेळ त्यांची देहबोली बचावात्मक झाल्याचे निदर्शनात आणते हे धक्कादायक आहे. गोलंदाजीही सुमारच होती. या तुलनेत ऑस्ट्रेलियन चांगलेच आक्रमक होते. भारतीय संघाकडे केवळ पाचच गोलंदाज होते ही चिंतेची बाब आहे, तसेच फलंदाजीही खोलवर नाही, असेही वॉनने म्हटले आहे.

भारताचे माजी खेळाडू, तसेच समालोचक संजय मांजरेकर यांनीही भारतीय संघ समतोल नसल्याची टीका केली. भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू नसल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संघात असा फलंदाज हवा जो तीन ते चार षटके गोलंदाजी करू शकेल, असे सांगताना मांजरेकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या स्टॉयनिस आणि मॅक्‍सवेल यांनी उदाहरणे दिली.

 

अधिक वाचा :

एफसी गोवाच्या रेडीमला कारणे दाखवा नोटीस 

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय ; भारतीय संघासमोर मालिकेतील आव्हान कायम राखण्याचे आव्हान

आयएसएलमध्ये बंगळूर सलग दुसऱ्या लढतीत विजयापासून दूर ; कालच्या सामन्यात हैदराबादशी बचावात्मक बरोबरी 

संबंधित बातम्या