मॅच सुरू होण्याआधीच विराट कोहलीने भारताला जिंकवले!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक 'पिंक बॉल' कसोटी सामना सुरू झाला आहे.  परदेशातील हा भारताचा पहिलाच आणि एकूण दुसरा दिवस-रात्र सामना आहे. यादरम्यान, विराट कोहलीने असे काही केले की भारताचे फॅन्स आनंदीत झाले आहेत. 

 
अ‍ॅडिलेड- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक 'पिंक बॉल' कसोटी सामना सुरू झाला आहे.  परदेशातील हा भारताचा पहिलाच आणि एकूण दुसरा दिवस-रात्र सामना आहे. यादरम्यान, विराट कोहलीने असे काही केले की भारताचे फॅन्स आनंदीत झाले आहेत. 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकली. ही  कोहलीसाठी आणि सबंध भारतासाठी एक चांगली बातमी आहे. याचे कारण म्हणजे कर्णधार कोहलीने नाणफेक जिंकल्यानंतर अजून एकही सामना गमावलेला नाही. विराटने एकूण ५६ कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषविले असून २६ सामन्यांमध्ये त्याने नाणेफेक जिंकली आहे ज्यातील तब्बल २१ सामने भारताने जिंकले असून ४ कसोटी सामने अनिर्णयीत राहिले आहेत. विदेशातही विराटने १० सामन्यांच्या आधी नाणेफेक जिंकली आहे. ज्यातील ८ सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला असून उर्वरित २ सामने अनिर्णयीत राहिले.  आज पहिला सामना ज्या अ‍ॅडिलेड ओव्हल मैदानावर खेळवला जातोय तेथेही विराटने  भारताला २०१८ मध्ये विजय मिळवून दिला होता.        

पिंक बॉल क्रिकेट ऑस्ट्रेलियाही आहे अजिंक्य 

दुसरीकडे आज खेळवल्या जाणाऱ्या पिंक बॉल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचाही रेकॉर्ड तितकाच चांगला असून ऑस्ट्रेलियाने मागील सातही पिंक बॉल सामने जिंकले आहेत.  ज्यात भारत अतिशय अनअनुभवी असून भारताने फक्त एक पिंक बॉल सामना खेळला आहे. 

संबंधित बातम्या