IND Vs SL: भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा उडवला धुव्वा

भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाचा 10 गडी राखून पराभव केला.
Indian women's Cricket Team
Indian women's Cricket TeamDainik Gomantak

Sri Lanka Women vs India Women, 2nd ODI Pallekele Smriti Mandhana Shafali Verma: भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या महिला संघाचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना 174 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाने अवघ्या 25.4 षटकांत बिनबाद विजय मिळवला. भारताकडून शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी तुफान फटकेबाजी केली. स्मृतीने नाबाद 94 धावा केल्या. तर शेफालीने 71 धावांची नाबाद खेळी खेळली.

दरम्यान, श्रीलंकेच्या महिला संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती आणि शेफाली भारतीय कॅम्पसाठी सलामीला आल्या. या दोघींच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारताने (India) सामना जिंकला. शेफालीने 71 चेंडूंचा सामना करत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 71 धावा केल्या. तर स्मृतीने 83 चेंडूत नाबाद 94 धावा केल्या. त्यांच्या या खेळीत 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. भारतीय संघाने हे लक्ष्य 25.4 षटकात पूर्ण केले.

Indian women's Cricket Team
IND vs SL Women: हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

तसेच, नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेताना श्रीलंकेच्या (Sri Lanka) संघाने 50 षटकांत सर्वबाद 173 धावा केल्या. यादरम्यान अमा कांचनाने 47 धावांची खेळी केली. तिने 83 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार मारले. डी सिल्वाने 62 चेंडूत 32 धावा केल्या. तिने तीन चौकार मारले. अटापट्टूने 45 चेंडूत 27 धावा केल्या. त्यांच्या खेळीत तीन चौकारांचा समावेश होता.

Indian women's Cricket Team
SL vs AUS: श्रीलंकेने रचला इतिहास! शेवटच्या 3 षटकात केल्या 59 धावा

शेवटी, टीम इंडियासाठी (Team India) रेणुका सिंगने शानदार गोलंदाजी केली. तिने 10 षटकात 28 धावा देत 4 बळी घेतले. रेणुकानेही मेडन ओव्हर काढली. मेघना सिंगने 10 षटकात 43 धावा देत 2 बळी घेतले. दीप्ती शर्माने 10 षटकात 30 धावा देत 2 बळी घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com