इंग्लंडविरुद्ध 7 धावांनी भारताचा विजय

इंग्लंडविरुद्ध 7 धावांनी भारताचा विजय
ingland.jpg

तीन एकदिवसीय सामन्यांच्या अंतिम आणि निर्णायक सामन्यात यजमान भारताने इंग्लंडचा आठवा फलंदाज सॅम कुरनला (नाबाद 95) बाद करून,  इंग्लंडला 7 धावांनी पराभूत करून मालिका 2-1 ने जिंकली. अशाप्रकारे, भारताने इंग्लंडला कसोटी, टी-ट्वेन्टी सोबतच वन-डे मालिकेत पराभूत केले. भारतीय संघाच्या कोट्यातील 50 ओव्हर मधले 9 चेंडू बाकी असतानाच भारतीय संघाचे सर्व खेळाडू बाद झाले होते. भारतीय संघाने इंग्लंड समोर  ३३० धावांचे  लक्ष्य ठेवले होते.(India won by 7 runs against England)

पहिल्या षटकात आक्रमकतेने खेळत  भुवनेश्वरने जेसन रॉयला त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद  केले, त्यानंतर पुढच्या षटकात भुवनेश्वरने योजना आखली आणि जॉनी बेअरस्टोला सापळा रचून एलबीडब्ल्यू आउट केले. सुरुवातीपासूनच अस्वस्थता दिसून आली आणि बेन स्टोक्ससुद्धा गरजेच्या वेळी मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला, मग कार्यकारी कर्णधार जोस बटलर सुद्धा 15 धावांवर शार्दुल ठाकूरच्या चेंडूचा बळी ठरला. लिव्हिंगस्टोनने (36) चांगली खेळी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानेही शार्दूलच्याच हातात झेल दिली आणि बाद झाला. त्यानंतर शार्दुलने आपला तिसरा आणि इंग्लंडचा सातवा बळी घेतला डेव्हिड मलानला सुद्धा चालते व्हावे लागले. पुढे सॅम कुरनने उत्तम खेळी करत केलेल्या 95 धावांमुळे इंग्लंडच्या बाजूला विजयाचे पारडे झुकताना दिसत होते, मात्र शेवटच्या षटकात विजय फक्त 14 धावांवर असताना टी. नटराजनने केलेल्या जबरदस्त गोलंदाजीमुळे भारतीय संघाला 7 धावांनी विजय मिळाला. 

आजच्या सामन्यात विशेष प्रदर्सन केले ते शार्दूल ठाकूरच्या(Shardul Thakur) गोलंदाजीने आणि कर्णधार विराट कोहलीने घेतलेली वेगात धावत जाऊन घेतलेली झेल सामन्याला विजयाकडे घेऊन गेली. तसेच भुवनेश्वने (bhvaneshwar) सुद्धा इंग्लंडच्या 3 महत्वाच्या फलंदाजांना बाद करून उत्तम खेळाचे सादरीकरण केले.  मात्र दुसऱ्या बाजूला हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) सोडलेले 2 झेल तर टी नटराजन आणि शार्दूल ठाकूरने सुद्धा मोक्याच्या वेळी झेल सोडल्याने क्षेत्ररक्षण खराब असल्याचे दिसून आले. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com