India vs New Zealand: गिलचा थरार, सिराजचा धमाका; टीम इंडियाचा रोमांचक विजय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला गेला.
India vs New Zealand
India vs New ZealandDainik Gomantak

India vs New Zealand: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने न्यूझीलंड वनडे मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. हैदराबादमध्ये बुधवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 12 धावांनी रोमांचक विजय नोंदवला. शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने 350 धावांचे लक्ष्य दिले, त्याला प्रत्युत्तरात किवी संघ 49.2 षटकात 337 धावांवर गारद झाला.

न्यूझीलंडकडून मायकेल ब्रेसवेल (78 चेंडूत 140) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने झंझावाती शतकी खेळीमध्ये 12 चौकार आणि 10 षटकार मारले. तर भारताकडून मोहम्मद सिराजने चार विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्याला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

India vs New Zealand
India vs New Zealand, ODI: टीम इंडियात तीन मोठे बदल, सूर्या-ईशानलाही संधी; जाणून घ्या Playing XI

दरम्यान, सलामीवीर शुभमन गिलने शानदार फलंदाजी करताना आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक ठोकले. त्याने 149 चेंडूंचा सामना केल्यानंतर 208 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार आणि 9 षटकार मारले. गिलने 49 व्या षटकात षटकारांची हॅट्ट्रिक मारुन द्विशतक पूर्ण केले. तर न्यूझीलंडकडून (New Zealand) हेन्री शीप्ली आणि डॅरिल मिशेल यांनी प्रत्येकी दोन, तर लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर आणि मिचेल सेन्चर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

दुसरीकडे, भारताने आपल्या डावाची संयमी सुरुवात केली. गिल आणि रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. रोहित 13 व्या षटकात 38 चेंडूत 34 धावा काढून बाद झाला. तर ईशान किशननेही (Ishan Kishan) (14 चेंडूत 5 धावा) स्वस्तात विकेट गमावली. सूर्यकुमार यादवने (31) गिलसोबत चौथ्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. 29 व्या षटकात सूर्या बाद झाला.

India vs New Zealand
India vs New Zealand: शुभमन गिलची बॅक टू बॅक सेंच्यूरी! कोहली-धवनचा रेकॉर्डही मोडला

तसेच, गिलने हार्दिक पंड्यासोबत (38 चेंडूत 28) पाचव्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदर (12) आणि शार्दिक ठाकूर (3) विशेष काही करु शकले नाहीत. 50 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गिल आठवा खेळाडू म्हणून बाद झाला. तर कुलदीप यादव (5*) आणि मोहम्मद शमी (2*) नाबाद राहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com