इंडियन ॲरोज आयएफए शिल्ड खेळणार

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा (एआयएफएफ) डेव्हलपमेंट संघ इंडियन ॲरोज आगामी आयएफए शिल्ड स्पर्धेत खेळणार आहे. कोलकात्यातील या जुन्याजाणत्या स्पर्धेची यंदा १२३वी आवृत्ती आहे. स्पर्धेस सहा डिसेंबरपासून सुरवात होईल.

नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा (एआयएफएफ) डेव्हलपमेंट संघ इंडियन ॲरोज आगामी आयएफए शिल्ड स्पर्धेत खेळणार आहे. कोलकात्यातील या जुन्याजाणत्या स्पर्धेची यंदा १२३वी आवृत्ती आहे. स्पर्धेस सहा डिसेंबरपासून सुरवात होईल.

इंडियन ॲरोजसाठी आगामी आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या तयारीसाठी आयएफए शिल्ड स्पर्धेतील सहभाग निर्णायक असेल. संघाचे मुख्य प्रशिक्षक व्यंकटेश षण्मुगम यांनी युवा संघाला या ऐतिहासित स्पर्धेत खेळण्याची संधी लाभत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या स्पर्धेद्वारे युवा फुटबॉलपटूंना सीनियर फुटबॉल खेळण्याचा अनुभव प्राप्त होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

आय-लीग स्पर्धा येत्या नऊ जानेवारीपासून खेळली जाणार असून इंडियन ॲरोज संघाचे शिबिर सध्या ओडिशातील भुवनेश्वर येथे सुरू आहे. शिबिरास शुक्रवारपासून सुरवात झाली, त्यात २८ युवा फुटबॉलपटूंचा समावेश आहे. भुवनेश्वर येथून संघ कोलकाता येथे आयएफए शिल्ड स्पर्धेत खेळण्यास जाईल. संघासमवेत प्रशिक्षक व्यंकटेश यांच्यासह सहा अधिकारी आहेत. शिबिरासाठी सविस्तर मानक परिचालन पद्धतीचा (एसओपी) अवलंब केला जाईल. 

संबंधित बातम्या