जर्मनीतील आयसोलेशनमध्ये अडकले भारतीय बॅटमिंटनपटू

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

जर्मनीत होत असलेल्या सॉरलॉलक्‍स ओपन बॅटमिंटन स्पर्धेत खेळण्यासाठी गेलेले काही भारतीय बॅटमिंटनपटू एकाला कोरोनाला झाल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. स्पर्धेतून तर माघार घ्यावी लागलीच आहे, परंतु आयसोलेशनध्ये अडकल्याने पुढील काहीच मिळत नसल्याने मोठी अडचण झाली आहे.

नवी दिल्ली : जर्मनीत होत असलेल्या सॉरलॉलक्‍स ओपन बॅटमिंटन स्पर्धेत खेळण्यासाठी गेलेले काही भारतीय बॅटमिंटनपटू एकाला कोरोनाला झाल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. स्पर्धेतून तर माघार घ्यावी लागलीच आहे, परंतु आयसोलेशनध्ये अडकल्याने पुढील काहीच मिळत नसल्याने मोठी अडचण झाली आहे.

या स्पर्धेतील गतविजेता लक्ष सेन याचे प्रशिक्षक असलेले त्याचे वडील डी. के. सेन हे कोरोनाबाधित झाले आणि त्यांच्यासोबत असल्यामुळे अजय जयराम आणि शुभांकर डे यांना स्पर्धेतून तात्काळ माघार घ्यावी लागली, तसेच सक्तीच्या आयसोलेशनमध्ये जावे लागले. स्पर्धा अर्धवट सोडावी लागल्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे, तसेच मायदेशात परतण्यासंदर्भातही अडचणी निर्माण होत आहेत, अशी खंत जयरामने ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. आमच्याही कोरोना चाचण्या करण्यात आल्या, त्या निगेटिव्ह आल्या आहेत. आम्हाला कोणतीही लक्षणे नाहीत, तरीही आयसोलेशनमध्ये असल्याने कोणाशीही संपर्क साधता येत नाही. जेवणासह इतर गोष्टीही आम्हाला संघटकांकडून कधी मिळणार याबाबतही काहीच कळत नाही. आमची पुढची चाचणी पुन्हा कधी होणार आणि मायदेशी कसे परतणार असे जयरामने म्हटले आहे

संबंधित बातम्या