INDvsENG 4th Test : पहिल्या डावात रिषभ पंत ठरला पुन्हा तारणहार  

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 5 मार्च 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा व निर्णायक सामना अहमदाबाद येथे खेळवण्यात येत आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा व निर्णायक सामना अहमदाबाद येथे खेळवण्यात येत आहे. आणि या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज रिषभ पंतने धमाकेदार कामगिरी करत शतक झळकावले आहे. त्याने केलेल्या या शतकीय खेळीमुळे रिषभ पंतने भारतीय भूमीवरील आपले कसोटीतील पहिले शतक लगावले आहे. तर कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण केले आहे. 

INDvsENG: कालच्या बाचाबाचीनंतर बेन स्टोक्सने विराट कोहलीला पाठवलं माघारी

याशिवाय रिषभ पंतने इंग्लंड विरुद्ध आपले दुसरे शतक लगावले असून, त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक देखील इंग्लंड विरुद्धच मारले होते. रिषभ पंतने 2018 मध्ये ओव्हल येथे झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातच कसोटी कारकिर्दीतील शतक झळकावले होते. यावेळी त्याने 114 धावांची खेळी केली होती. रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावरच टीम इंडियाचा संघ पहिल्या डावात 300 धावांपर्यंत पोहचला आहे.   

अहमदाबाद येथे सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना रिषभ पंतने षटकार खेचून आपले शतक झळकावले. रिषभ पंत 94 धावांवर असताना त्याने जो रूटच्या गोलंदाजीवर षटकार लगावून आपले शतक पूर्ण केले. रिषभ पंतने 115 चेंडूंचा सामना करताना 2 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने आपले शतक लगावले. मात्र त्यानंतर, रिषभ पंत 101 धावांवर असताना, जेम्स अँडरसनने त्याला जो रूटकरवी झेलबाद केले. रिषभ पंतनंतर वॉशिंग्टन सुंदरने पहिल्या डावात अर्धशतक मारले आहे. वॉशिंग्टन सुंदर सध्याच्या घडीला 57 धावांवर आणि अक्षर पटेल 11 धावांवर खेळत आहे.  

दरम्यान, चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांच्या फिरकीसमोर पाहुण्या इंग्लंड संघ अडखल्याचे पाहायला मिळाले होते. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 205 धावांवर आटोपला होता. अक्षर पटेलने भारताकडून सर्वाधिक चार बळी टिपले होते. तर रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज यांनी अनुक्रमे 3 आणि 2 विकेट्स मिळवल्या होत्या. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली होती.       

संबंधित बातम्या