विराटच्या आक्रमकतेनंतर भारतीय क्रिकेट मंडळााचा रोहितबाबत ‘खुलासा’

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

रोहित शर्माच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम आहे, अशी टिपण्णी करतानाच विराट कोहलीने तो संघासोबत ऑस्ट्रेलियास का आला नाही, अशी विचारणा केल्यावर भारतीय क्रिकेट मंडळाने खुलासा केला आहे.

मुंबई :  रोहित शर्माच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम आहे, अशी टिपण्णी करतानाच विराट कोहलीने तो संघासोबत ऑस्ट्रेलियास का आला नाही, अशी विचारणा केल्यावर भारतीय क्रिकेट मंडळाने खुलासा केला आहे. वडील आजारी असल्यामुळे रोहितने अमिरातीहून थेट ऑस्ट्रेलियास जाणे टाळले, असे मंडळाने सांगितले. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पूर्वसंध्येस रोहितबाबतचा संभ्रम संघासाठी योग्य नव्हे, असे सांगताना कोहलीने ज्याप्रमाणे वृद्धिमान साहाची पुनर्वसन प्रक्रिया ऑस्ट्रेलियात सुरू आहे, तसेच रोहित आणि इशांतबाबत होऊ शकले असते, असे सांगितले होते. विराटच्या या टिपण्णीनंतर मंडळाने गुरुवारी मध्यरात्री याबाबत पत्रक काढत खुलासा केला.

रोहितच्या तंदुरुस्तीची चाचणी ११ डिसेंबरला होईल आणि त्यानंतर त्याच्या कसोटी सहभागाबाबत निर्णय होणार असल्याचे कळवले आहे. रोहितच्या वडिलांची प्रकृती चांगली नव्हती, त्यामुळे त्याने अमिरातीहून मायदेशी परतण्याचे ठरवले. आता त्याचे वडील ठीक आहेत, असेही मंडळाने कळवले आहे. 

 

अधिक वाचा :

दिल्लीतील प्रदूषित हवा अर्धमॅरेथॉनच्या स्पर्धकांसाठी घातक ठरेल ; डॉक्टरांचा इशारा

आज हैदराबाद एफसीविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी बंगळूर एफसीची वेगळी व्यूहरचना

ऐतिहासिक कोलकाता डर्बीत एटीके मोहन बागानचे वर्चस्व

संबंधित बातम्या