भारतीय क्रिकेट संघाचे कोच रवी शास्त्रींनी घेतला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. त्यांनी अहमदाबादमधील एका लसीकरकण केंद्रावर जाऊन ही लस घेतली.

अहमदाबाद :  भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. त्यांनी अहमदाबादमधील एका लसीकरकण केंद्रावर जाऊन ही लस घेतली. याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरद्वारे दिली. "मी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला, या साथीच्या रोगाविरूद्ध भारताला सामर्थ्यवान बनवल्याबद्दल सर्व वैद्यकीय व्यावसायिक आणि शास्त्रज्ञांचे आभार”, अशा आशयाचं ट्विट त्यांनी यावेळी केलं. शास्त्री यांनी यावेळी लस घेतानाचा फोटोदेखील शेअर केला. रवि शास्त्री हे विद्यमान भारतीय क्रिकेट संघाचे कोच असून, माजी भाष्यकार, भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आहेत. 1981 ते 1992 दरम्यान त्यांनी भारताकडून आंतरराष्ट्रीय कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळले आहेत. 

विराट कोहलीच्या इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स; हा पराक्रम करणारा पहिला भारतीय

"कोरोना लसीकरणा दरम्यान अहमदाबादच्या अपोलो हॉस्पिटलमधील कांताबेन आणि त्यांची टीम सर्व प्रकारची काळजी घेत अत्यंत चांगलं काम करत आहेत", असंदेखील रवी शास्त्री आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी रवी शास्त्री सध्या भारतीय संघासह अहमदाबादमध्ये आहेत. तिसर्‍या कसोटी सामनाही याच ठिकाणी खेळवण्यात आला होता. जो डे-नाईट कसोटी सामना टीम इंडियाने दोनच दिवसांत जिंकला. 

INDvsENG : खेळपट्टीवरून व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी इंग्लंडला फटकारलं

कालपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. तसंच, शरद पवार, उपमुख्यमंत्री वेंकय्या नायडू यांनीदेखील लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ होताच, कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. 

संबंधित बातम्या