Indian Team Selector: टीम इंडियाचा मुख्य सिलेक्टर्स बनणार खेळाडू? BCCI ची ही पहिली पसंती

Indian Team Selector: बीसीसीआयनेही नव्या सिलेक्टर्संचा शोध सुरु केला आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Team India: T20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर BCCI ने मोठी कारवाई करत संपूर्ण निवड समिती बरखास्त केली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने नव्या सिलेक्टर्संचा शोधही सुरु केला आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीला बीसीसीआयने अनेक खडतर प्रश्न विचारले होते. आता मुख्य सिलेक्टर्स पदाच्या शर्यतीत भारताच्या एका माजी खेळाडूचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.

हा अनुभवी खेळाडू मुख्य सिलेक्टर्स होऊ शकतो

इनसाइड स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, मुख्य सिलेक्टर्स होण्याच्या शर्यतीत अजित आगरकरांचे (Ajit Agarkar) नाव आघाडीवर आहे. यापूर्वीही त्यांनी या पदासाठी अर्ज केला होता, मात्र काही कारणांमुळे ते मागे राहिले होते. अजित आगरकर सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) सहाय्यक प्रशिक्षक आहेत. त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे, जो टीम इंडियासाठी (Team India) उपयुक्त ठरु शकतो.

Team India
Team India: रोहित शर्माने टीम इंडियाचे T20 कर्णधारपद का सोडावे? ही 3 सर्वात मोठी कारणे

टीम इंडियाने अनेक सामने जिंकले

अजित आगरकरांनी भारतीय संघासाठी 23 कसोटी सामन्यात 58 बळी, 191 एकदिवसीय सामन्यात 288 बळी आणि 4 टी-20 सामन्यात 3 बळी घेतले आहेत. युवा खेळाडूंशी त्यांचे संबंध खूप चांगले आहेत. त्यांचा अनुभव संघ निवडीत उपयोगी पडू शकतो. अजित आगरकर भारतीय संघाचे मुख्य सिलेक्टर्स झाल्यास त्यांना दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षकपद सोडावे लागेल.

Team India
Team India: न्यूझीलंडविरुद्ध या 5 स्फोटक फलंदाजांनी केल्या सर्वाधिक धावा !

सिलेक्टर्संना काढून टाकले

T20 विश्वचषक 2022 मधील पराभवानंतर BCCI ने अचानक संपूर्ण निवड समिती हटवली. आता सिलेक्टर्स पदासाठी नव्याने अर्ज मागवण्यात आले आहेत. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील इंग्लंडविरुद्धच्या (England) उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाला 10 गडी राखून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com