मालिका जिंकूनही भारतीय संघाला का भरावा लागला दंड?

गोमंतक ऑनलाईन टीम
बुधवार, 9 डिसेंबर 2020

भारतीय संघ मंगळवारी झालेल्या सामन्यात निर्धारित वेळेत एक षटक मागे राहिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात मंद गतीने षटके टाकल्यामुळे सामना शुल्काच्या 20 टक्के रक्कम दंड स्वरूपात भरावी लागणार आहे. आयसीसीचे सामनाधिकारी डेविड बून यांनी हा दंड ठोठावला आहे. भारतीय संघ मंगळवारी झालेल्या सामन्यात निर्धारित वेळेत एक षटक मागे राहिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
  
आयसीसीने काल दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, 'आयसीसीने खेळाडू आणि स्टाफसाठी असलेल्या आचार संहितेच्या 2.22 कलमानुसार निर्धारीत वेळेत पूर्ण षटके न टाकल्याबद्दल संघावर सामना शुल्काच्या एकूण रकमेपैकी 20 टक्के रक्कम दंड म्हणून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.    

कर्णधार विराट कोहलीनेही याला हरकत दर्शवली नसून याबाबत काही औपचारिक घोषणा मात्र केली गेली नाही. मैदानावरील पंच रॉड टकर, गेरार्ड अबूड, टीव्ही पंच पॉल विल्सन आणि चौथ्या पंचाच्या भूमिकेत असलेले सॅम नोगास्की यांनी ही तक्रार केली होती. 
 
 भारतीय संघाने ही चूक पहिल्यांदा केलेली नाही. याआधीही ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरूवातीलाच पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर 20 टक्के रक्कम दंडाच्या स्वरूपात ठोठावण्यात आली होती. त्यावेळी विराटच्या संघाने आपल्या 50 षटकांसाठी 4 तास आणि 6 मिनिटांचा वेळ घेतला होता. या सामन्यात भारताला 66 धावांनी पराभूतही व्हावे लागले होते.  

  

संबंधित बातम्या