भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती 

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 420 बळी घेणारा गोलंदाजाने मागच्या महिन्यात खेळवण्यात आलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अशोक दिंडाने आज क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. अशोक दिंडाने कोलकाता येथे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. तसेच निवृत्तीची घोषणा करताना यावेळेस त्याने सर्वांचे आभार मानले.

INDvsENG: क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर; दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी 50 टक्के...

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 420 बळी घेणारा गोलंदाज अशोक दिंडाने मागच्या महिन्यात खेळवण्यात आलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तर अशोक दिंडाने भारताकडून 13 एकदिवसीय आणि 9 टी-ट्वेन्टी सामने खेळलेले आहेत. तसेच 2010 मध्ये झिम्बावे विरुद्धच्या सामन्यातून अशोक दिंडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकदिवसीय प्रकारात पदार्पण केले होते. आणि शेवटचा सामना 2013 मध्ये इंग्लंड सोबत खेळला होता. याशिवाय 2009 मध्ये नागपूर येथे झालेल्या टी-ट्वेन्टी सामन्यातून अशोक दिंडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. व अहमदाबाद येथे 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेला अखेरचा टी-ट्वेन्टी सामना खेळला होता. त्यानंतर आता अशोक दिंडाने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला. 

प्रोफेशनल लीग फुटबॉलमध्ये चर्चिल ब्रदर्सचा 5 - 0 फरकाने धुव्वा

घरगुती क्रिकेटमध्ये अशोक दिंडाने बंगालच्या रणजी संघाकडून पदार्पण केले होते. दशकभर बंगाल संघाबरोबर खेळल्यानंतर त्याने गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. तर यंदाच्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी स्पर्धेत अशोक दिंडाने तीन सामने खेळले होते.       

संबंधित बातम्या