Umesh Yadav दुसऱ्यांदा बनला 'बापमाणूस'! महिला दिनीच लेकीचा झाला जन्म

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला महिला दिनीच मुलीच्या जन्माची गुडन्यूज मिळाली आहे.
Umesh Yadav
Umesh YadavDainik Gomantak

Umesh Yadav Blessed With daughter: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादवला गोड बातमी मिळाली आहे. तो महिला दिनाच्या दिवशीच म्हणजेच 8 मार्च रोजी दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी तान्याने मुलीला जन्म दिला आहे.

याबद्दल उमेशने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'मुलीचा जन्म झाला आहे.' उमेश आणि तान्या यांना याआधी 1 जानेवारी 2021 रोजी पहिली मुलगी झाली होती. त्यानंतर आता दोन वर्षांनी पुन्हा एकदा उमेश आणि तान्याला आई-बाबा होण्याचा आनंद मिळाला आहे.

Umesh Yadav
Umesh Yadav: वडील गेल्याचं दु:ख विसरत मैदानात उतरला अन् घातली 'या' विक्रमाला गवसणी, पाहा Video

दरम्यान, उमेश सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाबरोबर आहे. त्याला 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळण्याचीही शक्यता आहे.

त्याने इंदोर कसोटीमध्ये मिळालेल्या संधीचे सोने करत चांगली कामगिरी केली होती. त्याने याच कसोटीदरम्यान, भारतात 100 कसोटी विकेट्स घेणारा 5वा वेगवान गोलंदाज होण्याचाही विक्रम केला होता.

Umesh Yadav
Umesh Yadav च्या वडिलांच्या निधनाबद्दल PM मोदींनी व्यक्त केला शोक, पत्रात लिहिलंय की...

गेल्याच महिन्यात झाला पितृशोक

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की उमेशला दोन आठवड्यांपूर्वीच 22 फेब्रुवारी रोजी पितृशोक झाला होता. त्याचे वडील आजारी असल्याचे समजले होते. महत्त्वाचे म्हणजे वडिलांच्या निधनाचे दु:ख विसरून काही दिवसातच उमेश भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धचा इंदोरमध्ये तिसरा कसोटी सामना देखील खेळला.

या सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण तीन 3 विकेट्सही घेतल्या. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकपत्र देखील पाठवले होते.

उमेशची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

उमेशने आत्तापर्यंत आंतराराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 55 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 168 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 75 वनडे सामने खेळले असून 106 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 9 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर 12 विकेट्स आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com