सौरव गांगुली आणि विराट कोहली अडचणीत; मद्रास हायकोर्टात याचिका दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

मोहम्मद रिजवी नावाच्या एका वकिलाने याप्रकरणी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत ऑनलाईन अॅप मध्ये पैसा लावून काही लोकांवर आत्महत्या करायची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.

चेन्नई- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना मद्रास उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ऑनलाईन फैंटसी अॅपचा प्रचार केल्याप्रकरणी त्यांनी ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त काही अभिनेत्यांनाही नोटीस दिली गेली आहे. न्यायमूर्ती एन किरूबकरान आणि बी पुग्लेनिधि यांनी याबाबत ही नोटीस दिली आहे. 

मोहम्मद रिजवी नावाच्या एका वकिलाने याप्रकरणी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत ऑनलाईन अॅप मध्ये पैसा लावून काही लोकांवर आत्महत्या करायची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. बेंचने म्हटलंय की हे अॅप आईपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्सच्या नावाने असल्याने हे अॅप्स पण राज्याच्या नावाने आहेत काय?, संबंधित संघ राज्यांकडून खेळतात काय?, न्यायाधीशांच्या बेंचने अॅप्सच्या मालकांवरही करोडो रूपये खर्च करून सेलिब्रिटींचा वापर केल्याचा आरोपही केला आहे. 
 
विराटला या आधीही आली होती नोटीस- 

 विराट कोहलीला नोटीस मिळण्याची ही पहिली वेळ नाही. या आधीही त्याला अशा नोटीस आल्या आहेत. ऑगस्टमध्ये चेन्नईच्या एका वकिलाने अशीच एक तक्रार दाखल केली होती. त्यावेळी ऑनलाईन सट्ट्याचे प्रमोशन करण्यावर प्रतिबंध करण्याची मागणी केली होती. त्यावेळी प्रसिद्ध लोकांच्या अटकेचीही मागणी करण्यात आली होती. त्यावेळी वकिलाकडून दाखल केल्या गेलेल्या याचिकेत सट्टा समाजासाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21चे उल्लंघन होत असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.  
 

संबंधित बातम्या